Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeबीड‘उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

‘उद्धारली कोटीकुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बीड (रिपोर्टर):- भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीच्या अनुषंगाने आज त्यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्यासह सर्वस्तरातून कोरोनाचे नियम पाळत पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

आपले संपुर्ण आयुष्य अखिल मानव जातीला कल्याणकारी आयुष्य जगण्यासाठी खर्ची घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३० वी जयंती आहे. डॉ. आंबेडकर यांनी अर्थशास्त्रासह मानवाच्या सर्वच विषयांमध्ये सखोल असे काम केले आहे. अनेक ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. उत्तूंग असे व्यक्तिमत्व लाभलेले डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्याख्यानमाला आणि अनेक कार्यक्रम राज्यासह जिल्ह्यात घेता आल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी समाजातील सर्वस्तरातील नागरिकांसह महसुल आणि पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी कोेरोनाचे नियम पाळत उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना बौद्धाचार्य पट्टेकर यांनी बुद्धवंदना आणि त्रिशरण वाचन केले. उपस्थितांनी ते ग्रहण केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

या वेळी रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्यासह पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव केळकर, तहसीलदार शिरीष वमने, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, विष्णू कांबळे, दिलीप भोसले, अजय सवाई, सुभाष लोणके, विकास जोगदंड, प्रशांत वासनिक, ऍड. राहुल कांबळे, ऍड. भगवान कांडेकर, राजू जोगदंड, विष्णू वाघमारे, अरुण सवाई, निखील सवाई, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, ऍड. सुरेश वडमारे, बबन वडमारे, बाळु विद्यागर यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!