Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, डोळ्यांचा वॉर्डही भरला मुलींच्या वसतिगृहात २८० खाटांची व्यवस्था, ऑक्सिजन...

जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल, डोळ्यांचा वॉर्डही भरला मुलींच्या वसतिगृहात २८० खाटांची व्यवस्था, ऑक्सिजन सुरू

जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांची रुग्णालयाला अचानक भेट
स्वच्छता राखा, रुग्णाच्या नातेवाईकांना कोविड वॉर्डात येऊ देऊ नका
खड्डे पडलेल्या रस्त्यावर तात्काळ डांबरीकरण करा
२८० खाटांच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सुरू करा
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर सर्व कामांना तात्काळ सुरुवात

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग वाढत चालल्याने जिल्हा रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले असून तातडीने मुलींच्या वसतिगृहात २८० खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज भल्या सकाळी अचानक रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. पाहणीमध्ये अस्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे जगतापांनी तात्काळ मुलींच्या वसतिगृहात ऑक्सिजन पुरठा सुरू करा, रुग्णालयामधील रस्त्यांवर पडलेले खड्डे नुसते बुजवू नका तर तेथे डांबरीकरण करा, रुग्णाच्या एकाही नातेवाईकाला कोविड वॉर्डात जावू देऊ नका, तशी कडेकोटी व्यवस्था करा, यासह अनेक सुचना दिल्यानंतर रुग्णालयात जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनानुसार काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल


बीड जिल्ह्यात रोज रुग्णांची संख्या हजाराने पार करू लागल्याने गंंभीर रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेडसह सामान्य रुग्णांसाठीही बेड उपबल्ध नाहीत. रुग्णालय बाधित रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले असून डोळ्याचा वॉर्डही उपचार घेणार्‍या रुग्णांनी भरला आहे. त्यामुळे रुग्णालयातील मुलींच्या वसतिगृहात आता तातडीने २८० खाटांची व्यवस्था केली जात आहे. त्याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सकाळी साडेआठच्या दरम्यान महसुलच्या अधिकार्‍यांसोबत जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. अचानक जिल्हाधिकारी आल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनात काही काळ धावपळ झाली. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी सकाळी घटनास्थळावर नव्हते. अशा स्थितीत जगतापांनी स्वत:हून रुग्णालयात राऊंड घेतला, परिस्थितीची पाहणी केली. अनेक त्रुटी आढळून आल्याने दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी ज्याचे काम ज्याच्याकडे आहे त्याला बोलावून घेत चांगलेच सुनावले. मुलींच्या वसतीगृहात तात्काळ ऑक्सिजन पुरवठा सुरू करून तेथील २८० बेड येत्या चोवीस तासाच सुरू करण्याचे आदेश दिले. रुग्णालयातील रस्त्यांवर खड्डे असल्याने या ठिकाणी तात्काळ डांबरीकरण करण्याचे आदेश दिल्यानंतर तिथेही कामाला सुरुवात झाली. स्वच्छतेबाबत हयगय नको, म्हणत कोविड वॉर्डात एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला जाऊ देऊ नका, नातेवाईकांसाठी बाहेर शेड उभारा अशा सूचना दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन अधिक सतर्क झाले. शेवटच्या क्षणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते आणि ईसीएस सुखदेव राठोड हे आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांनाही खडेबोल सुनावले.

जिल्हा रुग्णालयाची एसपींनीही केली पाहणी; वॉर्डातील नातेवाईकांना हुसकावले
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांना काही प्रमाणात त्रुटी आढळल्या. विशेष करून कोविड वार्डात नातेवाईकांना परवानगी नसतानाही अनेक नातेवाईक वॉर्डात असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत नाराजी व्यक्त करत पोलीसांना नातेवाईक न थांबवू देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी कोविड वॉर्डात जावून तेथील पाहणी केली व ज्या ठिकाणी नातेवाईक आहेत त्या सर्व नातेवाईकांना हुसकावून लावत इथून पुढे नातेवाईक थांबू देऊ नका, अशा सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
error: Content is protected !!