Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोना‘ब्रेक द चेन’ कर्फ्यूला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक रस्त्यावर

‘ब्रेक द चेन’ कर्फ्यूला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक रस्त्यावर

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ नावाने राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा संचारबंदीची घोषणा केल्यानंतर आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी बीड शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये फज्जा उडाल्याचे दिसून आले. लोक घरात बसायला तयार नाहीत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आणि वाहने पहावयास मिळाले त्यामुळे ज्या उद्देशाने हे लॉकडाऊन लावले आहे तो उद्देश अशा परिस्थितीत सफल होणार का?

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये रोज कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट ही गंभीर असून राज्यभरात ६० हजाराच्या वर रोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने अत्यावश्यक सेवा वगळता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा राज्यात १५ एप्रिल ते १ मे पर्यंत संपुर्ण संचारबंदी लागू केली. संचारबंदीचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसह कठोर कारवाईचे आदेश दिले. परंतु आज संचारबंदीच्या पहिल्या दिवशी बीड शहरासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या शहरातही ब्रेक द चेन या संकल्पनेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुकाने उघड्या आहेत. वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लोक बाहेर असल्याने ब्रेक द चेन विफल होण्याच्या मार्गावर असून कोरोनाचा समुहसंसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने एवढे मोठे पाऊल उचलल्यानंतर लोक घरात बसायला तयार नाहीत. त्यामुळे समुहसंसर्ग अशा अर्धवट लॉकडाऊनमुळे रोखला जाईलच का? हे सांगणे कठीणअसून मुख्यमंत्र्यांनी विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई अथवा कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी कारण आणि विनाकारण हे अमलबजावणी करणार्‍यांनी नेमके कसे समजून घ्यायचे, यात गफलत होत असल्याचे पहावयास मिळते.
मुख्यमंत्र्यांचा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांशी संवाद
गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ब्रेक दि चेनमधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकार्‍यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!