Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडडोईफोडे साहेब, गुटख्यात खा, अजून कुठे खा, मरणार्‍यांच्या टाळुवरचे लोणी का खाताय?

डोईफोडे साहेब, गुटख्यात खा, अजून कुठे खा, मरणार्‍यांच्या टाळुवरचे लोणी का खाताय?

रेमडिसीवीर प्रकरणात जिल्हाधिकारी साहेब डोईफोडेंवर कारवाई करा
बीड (रिपोर्टर):- हप्तेखोरीत बदनाम असलेले अन्न व औषध विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आता थेट मढ्यावरचे लोणी खाण्यास सुरुवात केल्याचे जाहीर आरोपच नाही तर घटनाक्रमही उघडकीस येत असून काल रात्री रेमडिसीवीर काळ्या बाजारात विकणार्‍या मेडिकल चालकाविरोधात कारवाई झाल्यानंतर या सर्व प्रकाराला अन्न व औषधचे डोईफोडे हे जबाबदार असल्याचे थेटपणे सांगितले जात आहे मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कुठलीही कारवाई केली नाही. अन्न व औषध प्रशासनाला जनतेचे आवाहन आहे, गुटख्यासह इतर गोष्टीत खाता, इथं जिवन-मरणाच्या परिस्थितीत तरी तोंड मारू नका.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

बीड जिल्ह्यामध्ये रेमडिसीवीरचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि ओरड झाल्यानंतर यावर नजर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र चोरालाच ऐवज सांभाळण्याची संधी दिल्याचे चित्र गेल्या दोन-तीन दिवसांच्य कालखंडात जिल्हाभरात उभं राहिलं. रेमडिसीवीर चढ्या भावाने विक्री केली जात असल्याची ओरड झाल्यानंतरही या प्रकरणाकडे डोईफोडे यांनी दुर्लक्ष केले. ज्या पद्धतीने गुटख्यासह अन्य पदार्थांचे हप्ते जमा करण्यात आणि पैसे खाण्यात मग्न असलेल्या डोईफोडेंनी रेमडिसीवीरमध्येही हात ओले करण्याचा धंदा सुरु केला याचे जीवंत उदाहरण रात्री लाईफलाईन मेडिकलवर अनुभवयास मिळाले. एका ग्राहकाला ५ हजार ४०० रुपयांना इंजेक्शन विकले गेल्यानंतर हे गंभीर प्रकरण समोर आले मात्र अद्यापपर्यंत रेमडिसीवीरची राखनदारी करणार्‍या डोईफोडेेंवर जिल्हाधिकार्‍यांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकच डोईफोडेंना आवाहन करतात, गुटख्यात खा, अन्य ठिकाणी खा, मढ्याच्या टाळुवरचे लोणी मात्र खाऊ नका. या आवाहनानंतर तरी जिल्हाधिकार्‍यांनी अशा बेपरवा अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!