आष्टी (रिपोर्टर):- आज मध्यरात्री पासून आष्टी तालुक्यातील वीज कर्मचारी संपावर गेले असून आष्टी शहरातील महावितरण कंपनी समोर वीज अधिकारी, कर्मचारी कामगारांनी यांनी आंदोलन सुरू केले असून सरकाच्या विरोधात वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन महावितरण कर्मचारी करत आक्रमक झाले होते.
आष्टी शहरातील महावितरण कार्यालयासमोर महावितरण कर्मचारी यांनी कोण म्हणत झुकत नाही झुकवल्याशिवाय राहणार नाही या सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे.वीज वितरण कंपनीच्या संपाचा अनेक गावांवर परिणाम झाला आहे. वीज वितरण कंपनीचे खासगीकरण होऊ नये या मुख्य मागणीसाठी संपूर्ण राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत.अर्ध्र्या आष्टी तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.या आंदोलनामुळे आता या गावचा विद्युत पुरवठा कधी येईल हे सांगणे कठीण आहे.त्यामुळे संपा दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे नागरिक चिंतेत आहे.या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत पोकळे, तालुकाध्यक्ष अमृत आजबे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब निंबाळकर,नितीन खिळे, विठ्ठल शेंबडे, शिवाजी गोरे, शिवाजी मार्कंडे,नितीन सायकड,किशोर साप्ते, मनोज निंबाळकर,सोमनाथ शिंदे,शहाजी कर्डिले,जगदाळे मॅडम, धस मॅडम, भालेराव मॅडम, नालकोल मॅडम,बापुराव कर्हे,आदी कर्मचारी उपस्थित होते.