Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात बंदित लोकांचा संचार

जिल्ह्यात बंदित लोकांचा संचार

लोकाहो, गांभीर्याने वागा, पंधरा दिवसात १० हजार पॉझिटिव्ह तर ९३ बाधितांचा मृत्यु
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग प्रचंड वाढला असून गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडात तब्बल १० हजार ५५ लोक कोरोना बाधित झाले आहे तर ९३ कोरोना बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती असतानाच ७ हजार ७६३ बाधितांनी कोरोनावर मात केली ही समाधानकारक बाब आहे मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन म्हणत राज्य शासनाने सशर्त लॉकडाऊन केले परंतु बीड जिल्ह्यातील जनता या लॉकडाऊनला हरताळ फासत बंदीत संचार करत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होण्यापेक्षा कोरोना वाढण्यात मदत होत आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ब्रेक द चेन म्हणत सशर्त लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त लॉकडाऊनला नागरिकांनी हरताळ फासत कारोनाची साखळी तोडण्याऐवजी कोरोना संसर्गाला प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने लोक सर्रास रस्त्यावर वागत असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. १ एप्रिल ते १५ एप्रिल या पंधरा दिवसांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात तब्बल १० हजार ५५ कोरोना बाधित आढळून आले आहेत. ९३ बाधितांचा मृत्यु झाला आहे. रोज हजाराच्या आसपास कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने जो सशर्त लॉकडाऊनचा पर्याय निवडून लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले मात्र बीड शहरासह जिल्हाभरात लोक ऐकायला तयार नाहीत. सर्रासपणे बंदीत संचार सुरू आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटेलच हे सांगणे कठीण आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे बीड जिल्ह्यातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील होऊन बसले आहे. अशा स्थितीतही बीडची आरोग्य यंत्रणा काम करत असल्यामुळेच या पंधरा दिवसांच्या कालखंडात तब्बल ७ हजार ७६३ बाधितांनी कोरोनावर मात केली ही एक समाधानाची बाब पुढे येत आहे. कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सशर्त लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!