Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाराजकारण इतरत्र जरूर करा, लोकांच्या जीवन-मरणाशी नको, धनंजय मुंडेंनी केली खासदार आणि...

राजकारण इतरत्र जरूर करा, लोकांच्या जीवन-मरणाशी नको, धनंजय मुंडेंनी केली खासदार आणि माजी पालकमंत्र्यांची कानउघडणीकोव्हॅक्सिनचे जिल्ह्यात १३२९० डोस शिल्लक, राज्य सरकारने उर्वरित लसींचा विचार करूनच केले २ लाख लसींचे वितरण
अचानक जाग आली की गोष्टी बदललेल्या दिसतात – धनुभाऊंचा पंकजाताईंना टोला

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २ लाखात शून्य लसी कशा हा प्रश्न का पडला नसावा? धनंजयंनी केली सविस्तर आकडेवारी जाहीर
बीड (रिपोर्टर):- राज्य सरकारने केंद्राकडून आलेल्या दोन लाख लसिंपैकी बीड जिल्ह्याला २० डोस प्राप्त झाल्यावरून माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या त्या ट्विट वरून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यात १३२९० डोस शिल्लक असून, हे डोस व नवीन आलेले डोस केवळ लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरावेत असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक लसी व आवश्यक लसीचे प्रमाण लक्षात घेत नवीन दोन लाख लसींचे वितरण करण्यात आले आहेत.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल


धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी लोकांच्या जीवन मरणाच्या या कठीण काळात राजकारण करू नये असा सल्लाही मुंडे भगिनींना दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसर्‍या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल. असा खोचक टोला लगावला आहे.
ना. मुंडे पुढे म्हणतात, ’बीड जिल्ह्यात सध्या दुसर्‍या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.’जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसर्‍या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही धनंजय मुंडे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात.दरम्यान आरोग्य संचालनालयाने वितरित केलेल्या दोन लाख लसी व प्रत्येक जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या लसींची अधिकृत आकडेवारी घोषित केल्याने, ना. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा मिळाला असून, मुंडे भगिनींनी अर्धवट माहितीद्वारे संभ्रम पसरवायचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तसेच लसींचा स्टॉक संपायच्या आत, पुढचा स्टॉक पाठविण्यात येईल व लसीकरण प्रक्रिया विना व्यत्यय सुरू राहील, अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा


एक पत्र प्रधानमंत्र्यांना पण पाठवा
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! अशी विनंती देखील ना. मुंडेंनी दोन्ही भगिनींना केली आहे.
बीड जिल्ह्यात जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असे भावनिक आवाहन मुंडेंनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा


आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात शून्य लसी मिळतील असा प्रश्न पडू नये का?
कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त दोन लाख लसींचा वितरणाचा जो चार्ट सकाळपासून समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामध्ये जालना व सोलापूर जिल्ह्यात शून्य आकडेवारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी धनंजय मुंडे यांनी शेअर करत. आपण शेअर केलेल्या २० लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे, आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवाल यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी मुंडे भगिनींना उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!