Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनापाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, महामंडळाकडून मयताच्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. परंतू, येथील आगार व्यवस्थापकाने मयताच्या नातेवाईकांना आगार बोलावून रक्कम दिल्याने, आगार व्यवस्थापकाच्या बेजबाबदार भूमिकेने कर्मचार्‍यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

सदरील कर्मचारी आजारी असताना त्याला रजा न देता, आगार व्यवस्थापकाने सक्तीने ड्युटीवर पाठवल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून गायकवाड हे आजारी होते. त्यांनी सदरील बाब आगार व्यवस्थापक यांच्या कडे तोंडी सांगीतली होती. तरीही त्यांना सक्तीने ड्युटीवर जाण्यास सांगितले. तसे न केल्यास कडक कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली होती. गायकवाड यांनी कोरोना चाचणी करून घेतल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना बीड येथून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवार ता. १४ रात्री दहा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान, सदरील कर्मचारी आजारी असताना त्याला रजा न देता, आगार व्यवस्थापकाने सक्तीने ड्युटीवर पाठवल्याची चर्चा असून, कर्मचार्‍यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेवराई आगार व्यवस्थापक यांचा मनमानी कारभार सुरू असून, त्यांच्या कारभाराला आगारातील चालक, वाहक व कर्मचारी कंटाळून गेले आहेत. कर्मचार्‍यांची बाजू ऐकून न घेता हुकुमशाही पद्धतीने त्यांनी कारभार चालवल्याने, त्याचाच परिणाम म्हणून आगारातील कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, दरम्यान, महामंडळाकडून मयताच्या कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत दिली जाते. परंतू, येथील आगार व्यवस्थापकाने मयताच्या नातेवाईकांना आगार बोलावून रक्कम दिल्याने, आगार व्यवस्थापकाच्या बेजबाबदार भूमिकेने कर्मचार्‍यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!