Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहिती
अंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम आता राज्यातच नव्हे तर देशभरात दिसून येत असून अनेक भागातून स्मशानातले भयावह फोटो वस्तूस्थिती दाखवून देत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात गेल्या अठ्ठेचाळीस तासात २३ बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. काल दिवसभरात १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणखी ९ मृतदेह शवागृहात आहेत.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

कोरोनाच्या समुहसंसर्गाने बीड जिल्ह्याला विळख्यात घेतले आहे. त्यात अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांया मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नगर, उस्मानाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचे मृत्यू होताना दिसून येत असतानाच अंबाजोगाईतही मृत्युचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. गेल्या ४८ तासात २३ कोरोना बाधित मृतदेहांवर अंबाजोगाईत अंत्यसंस्कार होत आहेत. काल दि. १७ एप्रिल २०२१ रोजीच्या दिवसभरात १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी १२ वाजता दोन मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात नेण्यात आले होते तर आणखी नऊ मृतदेह शवागृहात असल्याची प्राप्त माहिती आहे. शव वाहतुकीसाठी असलेल्या ऍम्ब्युलन्समध्ये दोन मृतदेह एकाच वेळी स्मशानात नेण्यात येत असतात. आज दिवसभरात अकरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!