Thursday, May 6, 2021
No menu items!
Homeक्राईमउघड्या खदाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उघड्या खदाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आणखी किती जणांचे प्राण घेणार या उघड्या खद्ाणी, दै.रिपोर्टरने उघड्या खदाणीचे प्रश्‍न उपस्थित करुन प्रशासनाला जाग आणण्याचा केला होता प्रयत्न
बीड (रिपोर्टर)ः- बीड शहराला चोही बाजूने खदाणीचा विळखा पडलेला दिसून येतो. विशेष म्हणजे बीड शहरालगत पाषाणी भाग असल्याने खदाणीसाठी उपयुक्त मानले जाते. प्रशासन नियमाने या खदाणी उत्खन्ननासाठी देतात. परंतू उपसा संपल्यानंतर नियमाने या खदाणी संबधीतांकडून भरून घेणे नियमात असतांना याकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्याचाच परिणाम शुक्रवारी सायंकाळी बीड शहराजवळील पांगरबावडी शिवारात एका खदाणीतील पाण्यात बुडाल्याने तिघांचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली. विशेष म्हणजे दै.रिपोर्टरने १५ मार्चच्या अंकात उघड्या खदाणी विषयी प्रश्‍न उपस्थित केला होता. परंतू फक्त ईटीएस मोजणी करुन अहवालाच्या प्रतिक्षेत बसलेल्या प्रशासनाला उघड्या खदाणी जिवघेण्या ठरतील याचा विसर पडला असवा. प्रशासनाला जागृत करुनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आणखी किती जणांचे प्राण घेणार या उघडया खदाणी असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर उभा राहीला असून आता तरी प्रशासनाने उघड्या खदाणी झाकून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणे करुन अशा दुर्घटना घडणार नाही.

2

रिपोर्टरच्या प्रतिनिधीने १५ मार्चच्या अंकात उघड्या खदाणी विषयी प्रश्‍न उपस्थित करुन प्रशासनाला या खदाणीमुळे होणारे नुकसान याची जाणीव करुन दिली होती. शहरालगत असलेल्या या उघड्या खदाणीतून मोठ्या प्रमाणात दगड उपसा झालेला आहे. अनेक वर्षापासून या खदाणीची ईटीएस मशीनने तपासणी केली नसल्याने या उघड्या खदाणीतून सर्रास दगड उपसा सुरू असतो. नियमाने किती फुट खदाणी खांदून दगड काढले पाहीजे. अशी नियमावली असतांना अनेक नियमांचे उल्लघंन करुन दगड उपसा सुरू आहे. तसेच काही जुन्या खदाणी ज्याचे कंत्राट प्रशासनासोबत संपलेले आहे. अशा खदाणी कचर्‍याने भरुन घेेणे. त्या खदाणीवर वृक्षरोपन करुन ते भगदाड भरुन घेणे. परंतू कंत्राट संपला म्हणून प्रशासनानेही या खदाणीकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम अनेक खदाणीचे तलावात रुपांतर होत चालले आहे. अनेक खदाणीत पाणी असल्याने तरुण मुले त्या खदाणीत पोहायला किंवा मासे पकडायला जातात. अशा प्रकारे दुर्घटना घडण्याची शक्यता टाळता येणार नाही. म्हणून प्रशासनाने आता तरी या खदाणी भरुन घेवून ग्रामस्थांना व शहराच्याकडेला राहाणार्‍यांना दिलासा दयावा जेणे करुन अशा दुर्घटना घडणार नाही.
कालच्या घटनेला जबाबदार कोण?
अनेक अशा ठिकाणी प्रशासन किंवा त्यांचा अधिकारी पोहचत नाही. अशा ठिकाणी रिपोर्टरच्या प्रतिनिधीने जावून ग्रांऊड रिपोर्र्टींगच्या माध्यमाने उघडया खदाणीचा प्रश्‍न प्रशासनासमोर उपस्थित केला होता. यावृत्ताला प्रकाशीत होवून तब्बल एक महिना झाला.प्रशासनाने या उघडया खदाणी संदर्भात वृत्ताची दखल का घेतली नाही. किंवा घेतली असेल तर फक्त कागदोपत्रीच घेतली असावी जर प्रत्येक्षात प्रशासकीय अधिकार्‍यांने उघडया खदाणीजवळ जावून पाहणी केली तर गौण खणीजचे खरा उपसा या खदाणीतूनच होतोयं याची जाणीव होईल. तसेच काल शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या घटनेत खदाणीत बुडून तिघांचा मृत्यु झाला. या घटनेला जबाबदार कोण? प्रशासन की संबधीत खदाणधारक या सर्व घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करुन व संबधीतांना न्याय मिळवून दयावा. असा दबक्या आवाजात जनतेतून सुर निघत होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!