Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यातील लस संपली 43 केंद्रांवरील लसीकरण ठप्प

जिल्ह्यातील लस संपली 43 केंद्रांवरील लसीकरण ठप्प

बीड (रिपोर्टर):- राज्यभरात कोरोनाचे गंभीर परिणाम समोर येत असताना कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी होत आहे. परंतु राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोप-प्रत्यारोपातून अनेक ठिकाणचे लसीकरण केंद्र लसीअभावी बंद पडत आहेत. बीड जिल्ह्यातही तब्बल 143 लसीकरण केंद्र लसीअभावी बंद असून आता नागरिकच लस घेण्यासाठी उत्सुक असल्याने जो तो लसीची मागणी करत आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बीड जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्र आज लस संपल्यामुळे बंद आहेत. 1 लाख 53 हजार 966 इतक्याच व्यक्तींना जिल्ह्यात लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर अवघ्या 22 हजार 213 लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयासह बीड जिल्ह्यात 143 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सीन आणि कोविडशिल्ड या लसी नागरिकांना दिल्या जातात. ज्यांचे वय 45 वर्षे आहे अशांनाच लस देण्यात येईल त्यामुळे आपोआपच लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी झाली मात्र याही लोकांना लसीचा तुटवडा जाणवू लागला. आज लस संपल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्र ठप्प झाले आहेत. पहिल्या लसीचा डोस बीड जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाला कधी येईल हे सांगता येत नाही मात्र आज संध्याकाळी लसीचे सात हजार डोस आरोग्य प्रशासनाला प्राप्त होतील. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलाय त्यांनाच आता दुसरा डोस देण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!