Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeकोरोनाधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे रुग्णांसाठी आणि लोकांसाठी खर्च करत आहेत. आज शंभर रेमडिसीवीर आले, आणखीही येतील परंतु केवळ सत्ताधार्‍यांना पाण्यात पाहणार्‍या विरोधकांनी माता असणार्‍यांनी एखादं तरी मोफत इंजेक्शन रुग्णाला द्यावं, राजकारण करण्यापेक्षा या भयानक परिस्थितीत लोकांना आधार द्यावा तेव्हा त्यांच्या आरोपांना आणि विरोधाला महत्व प्राप्त होईल. अशा जळजळीत प्रतिक्रिया आता जनतेतून ऐकावयास मिळत आहेत.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ही राजकारण करण्याची वेळ नाही, एकमेकांना आधार देण्याची वेळ आहे. सत्ताधारी असो की विरोधक असो, त्याने अशा गंभीर परिस्थितीत लोकांना मदत कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालखंडात बीड जिल्ह्यातील जनतेला आणि कोरोनाबाधीत रुग्णांना मदत करण्यासाठी सातत्याने धावून येतात. मध्यंतरी शेतकर्‍यांचा भाजीपाला खरीदी करून पालकत्वाचं दातृत्व त्यांनी दाखवून दिलं. अडचणीत आलेला प्रत्येक व्यक्ती थेट धनंजय मुंडेंशी संपर्क साधतो, ते लोकांचे फोनही उचलतात. स्वत: दोन वेळेस कोरोना बाधित झाले, तरीही लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत राहिले. कोरोना रुग्णांसाठी हेल्पलाईन केंद्र उघडले आणि आता काल-परवा दोनशे पन्नास रेमडिसीवीर जिल्हा रुग्णालयाला देण्याचे ठरवले. काल 50 आज 50 असे शंभर इंजेक्शन आले आणखीही येतील. धनुभाऊ तुम्ही लोकांसाठी खुप करताय, तुम्हाला नागरिकांचे आशीर्वाद लाभतील, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. जे लोक केवळ पत्रकबाजी करून छोट्या-मोठ्या त्रुट्या काढत आरोपाचा सपाटा लावत आहेत त्या प्रबळ विरोधकांनी, ‘माता’ म्हणवून घेणार्‍यांनी मातृत्वाचं दातृत्व कधी दाखवलं का? एखादं इंजेक्शन मोफत दिलं का? अशा भयावह परिस्थितीत राजकारण सोडा आणि लोकांना मोफत रेमडिसीवीर कसे मिळेल याचं दातृत्व दाखवा. 
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!