जिल्हा परिषद समोरील जुने झाडे तोडली
वनविभागाकडून घेतली शाळेने परवानगी
बीड (रिपोर्टर) नगर रोडवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेसमोर काही जुनी झाडे होती. या झाडांना वाळवी लागली होती. वार्याने झाडे तुटून कुणाच्या अंगावर पडू नये म्हणून वनविभागाची परवानगी घेऊन आज सकाळी झाडे तोडण्यात आली.
नगर रोडवर जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेमध्ये काही वर्ष जिल्हा परिषदेचे कार्यालय होते. शाळेच्या आवारामध्ये नीलगिरीसह इतर काही झाडे होती. ही झाडे जुने होती. झाडांना आतून वाळवी लागली होती. झाडे कुणाच्या अंगावर पडू नये यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी वनविभागाकडून परवानगी घेऊन आज सकाळी झाडे तोडण्यात आली.