शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, ‘अमर रहे रहे आजिनाथ काळे अमर रहे,भारत माता की जय’ च्या घोषणात अखेरचा निरोप
आष्टी(रिपोर्टर):- आठ दिवसापासून आजारी असल्याने सुट्टीवर आलेल्या हाकेवाडी येथील जवानांवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्याचा मुत्यु झाला. रात्री उशिरा त्याच्यावर हाकेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.हाकेवाडी गावात शोककळा पसरली आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव हाकेवाडी येथील छत्तीसगड येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत असणारे अजिनाथ शहादेव काळे हे आठ दिवसापासून आजारी होते.ते सुट्टीवर लोणी प्रवरा येथे राहत असलेल्या कुटुंबाकडे आले. लोणी येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार घेऊन त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्याचे निधन झाले, ही बातमी कळताच धामणगाव हाकेवाडी व पंचक्रोशीत व आष्टी तालुक्यात तसेच बीड जिल्ह्यात दुःखाचा डोंगर कोसळला, आजिनाथ शहादेव काळे वय 38 वर्ष होते. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात,आई ,वडील, पत्नी, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. अमर रहे ,अमर रहे आजिनाथ काळे अमर रहे, भारत माता की जय वंदे मातरम् या घोषणा देत , शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
डेंग्यु आजाराने मुत्यु झाल्याची चर्चा आजिनाथ काळे हे कर्तव्यावर असतानाच आजारी होते.पण सुट्टीवर लोणी प्रवरा येथे आले.तिथुन उपचार घेऊन सुधारणा न वाटल्याने अहमदनगर येथील एका रूग्णालयात दाखल केले.त्याचा मुत्यु हा डेंग्यु आजाराने झाल्याचे बोलले जात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच मुत्यु कोणत्या आजाराने झाला याचे निदान होईल.