Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडआ.संदीप भैय्यांची सूचना, विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची यंत्रणा लागली कामाला...

आ.संदीप भैय्यांची सूचना, विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची यंत्रणा लागली कामाला !

पाणी प्रश्नी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी घेतला आढावा
रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर नियमित पाणी पुरवठा करा

बीड (रिपोर्टर):- शहरातील व शहराच्या हद्दवाढ भागतील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने याबाबत नागरिकांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या कडे तक्रारी केल्यानंतर आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सूचना करताच पालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा खडबडून जागी झाली, या पाणी प्रश्नी
उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, यांनी रस्त्यावर उतरत ईदगाह नाका नाळवंडी नाका पाणी टाकीवर जाऊन पाणी प्रश्नांचा आढावा घेतला. रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, त्यात कसलाही व्यत्यह येणार नाही याची काळजी घ्या,पाणी पुरवठा करताना कोणी हलगर्जीपणा केल्यास त्यावर थेट कारवाई करा आशा सूचना उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

बीड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.यावर आज उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी आढावा घेतला. रमजान सनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा यावर प्रमुख्याने आढावा घेण्यात आला. शहरातील सर्वच भागात सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.पाणी पुरवठा करत असताना कसल्याही प्रकाराची दिरंगाई होता कामा नये आशा सूचना यावेळी देण्यात आल्या,यावेळी नगरसेवक भिभिषण लांडगे,विशाल घाडगे,शेख मुजीब,शेख रहीस , पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके ,पाणी पुरवठा विभागाचे दुधाळ यांच्या सह पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

आवश्यकतेनुसार टँकर वाढवा
सध्या मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजाण सण सुरू आहे, आशा वेळी पाण्याची मागणी वाढते. तसेच उन्हाळा असल्याने हद्दवाढ भागात पाणी टँकर देण्यात यावे अशी मागणी होते. यावेळी आवश्यकते नुसार पाणी टँकर वाढवण्यात यावे असे निर्देश उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!