Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडझुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे निधन

झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे निधन

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील मातावळी येथील दै.झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने मागिल काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार घेत असताना आज सोमवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी बीड जिल्ह्यात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज औरंगाबाद येथील त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील श्रीपती माने (वय 55 वर्ष) हे गेल्या 8 दिवसांपासून कोरोना बाधित होते.बीड वरुन पुणे औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या दवाखान्यात उपचार घेतले गेल्या काही दिवसांपासून कोरोनावार ते झुंज देत होते. ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. श्रीपती माने हे बीड येथील झुंजार नेता दैनिकाचे निवासी संपादक म्हणून काम पाहत होते. सर्व जिल्हाभरात त्यांची एक वेगळीच ओळख होती. गेल्या 32 वर्षांपासून ते झुंजारनेतामध्ये काम करत होते. एक ऊसतोडणी कामगार ते जिल्ह्यातील मोठ्या दैनिकाचे निवासी संपादक अशी त्यांची वाटचाल राहिलेली असून त्यांच्या निधनाने जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. माने कुटुंबियांच्या दु:खात सायं.दैनिक रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!