Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडग्राउंड रिपोर्टींग -ड्रगिस्ट अटॅक, स्टुडंस् स्ट्राईक

ग्राउंड रिपोर्टींग -ड्रगिस्ट अटॅक, स्टुडंस् स्ट्राईक


नशेखोरी करणार्‍यांची मिल्लीया कॉलेज परिसरात दहशत, विद्यार्थ्यांना धमकी देवून लुटमारीच्या घडल्या घटना; मुलीची छेडछाड हा तर रोजचाच विषय
लाल भडक डोळे, त्या डोळ्यात उतरलेले रक्त, कंबरेला लावलेले हत्यार हे पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होणार नशा करून अशा अवस्थेत हत्यार बंद सर्रास कॉलेज परिसरात जर गुंडांचा वावर होत असेल तर सहाजिकच आहे की त्या कॉलेज परिसरात शिक्षण घेणारे विद्यार्थी दहशतीतच शिक्षण घेणार. अशीच काही अवस्था शहरातील मिल्लीया कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची होत असावी. तसे पाहिले तर मिल्लीया कॉलेजमधून दबक्या आवाजात अनेक वेळा तक्रारी कानावर येत असे. परंतू या तक्रारीला कोणत्याच प्रकारचा पुरावा नसल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांना अशा पोरांचा त्रास सहन करावा लागत होता. आता मिल्लीया कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांनी गुप्तपणे विद्यापीठ कुलगुरूंना मिल्लीया शाळेत होणार्‍या ढेपाळ कारभाराची माहिती अर्जाद्वारे दिली असून आता कुलगुरू काय उपाय योजना करतील याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. सध्या कोरोना असल्याने कॉलेज, शाळा बंद आहेत. परंतू ऑफलाईन परीक्षेसाठी काही प्रमाणात कॉलेज सुरू झाले होते. कॉलेज सुरू होताच कॉलेज परिसरात नशाखोरी करून दहशत पसरविणार्‍या मुलांनी पुन्हा पाय पसरले होते. ऑफलाईन परीक्षे दरम्यान कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या काही मुलांना नशेखोर मुलांकडून अडवून पैसे घेणे, त्यांना धमकी देणे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मिल्लीया कॉलेजमधील काही मुलांनी तक्रार कुलगुरूंपर्यंत पोहचवली असून या संदर्भात अद्यापही मिल्लीया कॉलेज प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याची माहिती मिल्लीया कॉलेज प्रशासनाने दिली. गेल्या अनेक वर्षापासून नशेखोर मुलांकडून तेथील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतू कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांनाच दमदाटी देवून गप्प बसण्यास सांगतात. त्यामुळेच गुंडागिरीला वाव आला असून विशेष म्हणजे किल्ला मैदान परिसरात मिल्लीया आणि बलभीम असे दोन कॉलेज आहेत. परंतू कडक प्रशासक म्हणून बलभीम कॉलेजकडे पाहिले जाते. तेवढेच ढेपाळलेले मिल्लीया कॉलजचे प्रशासक अजिबात विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थीनींच्या सुरक्षेकडे लक्ष देतांना दिसत नाहीत. विशेष म्हणजे मिल्लीया कॉलेज परिसरात अनेक विविध शैक्षणिक विभाग असल्याने हमखास विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. म्हणून 24 तास मिल्लीया कॉलेजचे गेट उघडे असल्याने आवो जावो घर तुम्हारा अशी अवस्था कॉलेजची झालेली दिसून येत आहे. शेजारी असलेल्या बलभीम कॉलेजकडून मिल्लीया कॉलेज प्रशासनाने बोध घेण्याची गरज असून फक्त दिन जावो पगार आवो अशा प्रकारे त्या कॉलेजमधील प्राध्यापक, प्राचार्य विद्यार्थ्यांसोबत टाईमपास करत असल्याचे दिसून येत आहे. झोपेच्या गोळ्या व कोडिनयुक्त औषधाचे सेवन करून या नशेत नशेखोरांना आपण काय करत आहोत याचेही भान नसते. तसेच काही प्राचार्य व शिक्षक या नशेखोर गुंडांना हाय, हॅलो करून आपली नोकरी करत असल्याचेही चित्र कॉलेज परिसरात दिसून येते. विद्यार्थ्यांनी या गुंडांना काही बोलले तर शिक्षक विद्यार्थ्यांची बाजू घेण्याऐवजी त्या गुंडांच्या मनासारखे करून गुंडगिरीला खतपाणी देत असल्याचे दिसून येत आहे. बीड शहर पोलीस ठाणे अंतर्गत शक्ती पथकमधील कर्मचारी रमा तुरूकमारे व प्रतिभा चाटे, पोलीस शिपाई गणेश जाधव हे सतत या दोन्ही कॉलेज परिसरात राऊंड मारून टवाळखोरी करणार्‍या मुलांना ताब्यात घेतात. तसेच त्यांच्या पालकांना सूचना पण देतात. तरीही मिल्लीया कॉलेज परिसरातील गुंडगिरी कमी होतांना दिसत नाही.
या महिन्यात मिल्लीया कॉलेजमध्ये ऑफलाईन परीक्षा होत्या. दरम्यान काही नशेखोर गुंडांनी विद्यार्थ्यांना त्रास दिल्यानंतर या मुलांनी कुलगुरू यांच्याकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. परंतू आपले नाव समोर आले तर हे गुंड मुले आपल्याला त्रास देतील या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी गुप्तपणे कुलगुरूपर्यंत आपली तक्रार पोहचवली. या संदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीला कॉलेजमधील विद्यार्थ्यांना होणार्‍या त्रासासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तक्रार देणार्‍या विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेवून व मिल्लीया कॉलेजचे प्राचार्य यांच्यासमोर ही समोर घटना मांडून या विषयावर अभ्यास केला असता या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नशा करून गुंडगिरी करणार्‍यांपासून मोठा त्रास होतो. तसेच मुलीची छेडछाड हा तर कॉलेज परिसरातील रोजचाच विषय होता. परंतू हत्यारबंद गुंड मुले कॉलेज परिसरात येवून विद्यार्थ्यांना धमकी देवून त्यांच्याकडून पैसे जर उकळायला लागले तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी कुलगुरूचे दार ठोठावले. विशेष म्हणजे दिलेल्या तक्रारीत कॉलेज प्रशासनाचे वचक नसल्याने दादागिरीला वाव आले असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही प्राध्यापक फक्त थंब लावण्यासाठी येतात तर काही शिक्षक उशिरा येतात. दरम्यान हे गुंड मुले विद्यार्थ्यांना त्रास देतात. तसेच हातात तलवार, चाकू घेवून कॉलेज परिसरात येतातच त्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर विचित्र प्रकारचे ड्रग्ज सेवन करून विद्यार्थ्यांनाही ड्रग्ज सेवन संदर्भाचे फायदे सांगतात. या नशेखोर मुलांच्या जाळ्यात काही उच्च घराण्यातील विद्यार्थी अडकल्याचे ही माहिती मिळाली असून दादागिरीच्या नावावर कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना ड्रग्ज सप्लाय तर होत नाही. या दृष्टीकोनातूनही विचार करण्याची गरज असून मिल्लीया कॉलेजचे प्राचार्य डॉ.फाजेल इलियास यांनी कॉलेज परिसरातील पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी अशी विनंती रिपोर्टरच्या माध्यमाने पोलीस प्रशासनाला केली आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ground reporting


कॉलेज प्रशासन गुंडगिरीला आळा घालण्यास असमर्थ
किल्ला मैदान परिसरात दोन कॉलेज असल्याने हमखास कॉलेज सुरू होतांना व सुटतांना मोठी गर्दी होते. दरम्यान जर प्राध्यापक उशिरा आले तर हमखास मिल्लीया कॉलेजचे विद्यार्थी परिसरातच उभे असतात. त्या दरम्यानच नशेखोर गुंड आपल्या दादागिरीचा वापर करून कॉलेज परिसरात दहशत पसरवितात. तसेच काही कॉलेजमधील विद्यार्थी ज्यांना दादागिरी करून आपले शिक्षण पुर्ण करायचे आहे असे विद्यार्थी नशेखोर गुंडांचा आधार घेवून कॉलेज परिसरात आपली चालवितात. तर काही शिक्षक भितीपोटी गप्प बसतात. जर एखादा पालक आपल्या मुलाला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आल्यावर त्याचे नवे नाव ठेवून चिड निर्माण करतात. त्यामुळे विद्यार्थी आपल्याला झालेला त्रास पालकांना सुद्धा जावून सांगत नाही. त्यामुळे आणखीच दादागिरीला वाव आला असून जर कॉलेज प्रशासनाला गुंडगिरीला आळा बसवता येत नसेल तर थेट पोलीसांची मदत घ्यावी. परंतू कोठेतरी दादागिरीला लगाम लावणे गरजेचे आहे.

नशेखोर गुंडांचा असाही हैदोस
शनिवारी रिपोर्टरच्या प्रतिनिधीने शक्ती पथकातील कर्मचार्‍यांना फोन लावून मिल्लीया कॉलेजमध्ये येण्यासाठी विनंती केली. अवघ्या 14 मिनिटात शक्ती पथक मिल्लीया कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यावेळी पथकाचे सर्व्हेसर्वा रमा तुरूकमारे यांनी रिपोर्टरच्या प्रतिनिधीला अशी माहिती दिली की, कॉलेज सुरू असतांना नुसती या परिसरातून चक्कर मारली तरी दोन ते तीन टावाळखोर पोरे ताब्यात येतात. तसेच काही गुंड प्रवृत्तीची मुले कॉलेजच्या छतावर बसून आपले कारणामे करत असतात. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आम्ही छतापर्यंत त्या गुंडांचा पाठलाग करतोत. परंतू ती मुले कॉलेजच्या छतावरून उड्या मारून दुसर्‍याच्या छतावरून पळ काढतात. या मुलांच्याही जिविताला धोका निर्माण होवू शकतो. परंतू स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे गुंड मुले पोलीसांची गाडी पाहिल्यानंतर अशा प्रकारे हैदोस घालतात अशी माहिती दिली. तसेच कॉलेजमधील कर्मचार्‍यांनी असे सांगितले की, शक्ती पथकामुळेच सध्या कॉलेज परिसर शांततेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!