Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीडपंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर

पंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर


लोकाहो, हात जोडतो घराबाहेर पडू नका, आपला जीव धोक्यात घालू नका घरात राहा अन् प्रशासनाला
सहकार्य करा; जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांचे जिल्हावासियांना पोटतिडकीचे आवाहन

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वैद्यकीय व्यवस्थेपेक्षा अधिक होत आहे. आज मितीला पंधराशेपेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. रोज तीन हजारापेक्षा जास्त जम्बो सिलिंडरची गरज भासत आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. लोकाहो, कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्य करा. हात जोडतो, घराबाहेर पडून का, आपला जीव धोक्यात घालू नका, तुम्ही घरात राहाल तर प्रशासनाला तेच सर्वात मोठे सहकार्य असेल, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पोटतिडकीने जिल्हावासियांना केले.


ते सायं. दैनिक बीड रिपोर्टरशी बोलत होते. कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रोज रुग्ण हजारोंच्या वर वाढत आहेत. आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे. अशा परिस्थितीतही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे लोकांनी समुहसंसर्ग टाळावा, घरातच रहावे, आजची परिस्थिती चिंताजनक आहे. पंधराशेपेक्षा जास्त रुग्णांना आज ऑक्सीजनची गरज आहे. ते ऑक्सीजनवर आहेत, रोज 3 हजार 300 पेक्षा अधिक जम्बो सिलिंडर लागतात. ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी आज मोठी धावपळ करावी लागत आहे. आजुबाजुच्या जिल्ह्यालाही ऑक्सिजनची मोठी गरज असल्याने तेथूनही मदत मिळणे मुश्किल झाले आहे. ऑक्सिजनसाठी लागणारे लिक्विड चाकणवरून येते. तिथेही अधिक भार पडला आहे. आता या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असे तर लोकाहो, विनाकारण घराबाहेर पडू नका, घरातच बसून राहा, हेच प्रशासनाला सर्वात मोठं सहकार्य असेल, असे आवाहन करत जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांनी आपल्याकडे ऑक्सिजनचं उत्पादन होत आहे. परंतु ते पुरत नाही, असं सांगून अनेक अडचणी बोलून दाखविल्या. यावर मात तेव्हाच होईल जेव्हा नागरिक तुम्ही-आम्ही एकमेकांना सहकार्य करतील. आमका बाहेर फिरता, तमक्याची दुकान उघडी आहे, या तक्रारी करत बसण्यापेक्षा, त्याने केलं म्हणून मला करायचं, या भूमिकेत राहण्यापेक्षा आज स्वत:चं जीव वाचवणं, स्वत:च्या घरातील कुटुंबियांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे महत्वाचे काम आहे. त्याकडे लोकांनी लक्ष देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!