Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडनागापूर येथील वाण धरणावर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

नागापूर येथील वाण धरणावर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

परळी (रिपोर्टर)- परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणावर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येऊन शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वीज प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी धरणावर जलपूजन करण्यासाठी ना. मुंडे आले असता येथील स्थानिक शेतकर्‍यांनी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवून विजप्रश्न सोडविण्याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार नागापूर येथील वाण धरण येथे तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, जेणेकरून शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही, तसेच स्थानिकांचा विजप्रश्न मार्गी लागावा या दृष्टीने धरण परिसरात ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे निर्देश ना. मुंडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. येत्या काही दिवसातच येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असून सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल असे महावितरणच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!