Friday, May 7, 2021
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- गाफीलपणा

प्रखर- गाफीलपणा


कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा प्रचंड सतर्कता बाळगली गेली. एखादा रुग्ण कुठे आढळला की, तो परिसर सील केला जात होता. त्याच्या संपर्कात किती लोक आले, त्या सर्वाचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी केली जात होती. रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या लाटेत तितका जीव लोकांना गमवावा लागला नाही. मात्र दुसरी लाट आली आणि सगळेच गाफील राहिले. आरोग्य यंत्रणा पहिल्या पासून सर्तक असली तरी आरोग्य विभागातील काम करणारे माणसेच आहेत? आरोग्य विभागातील अनेक कर्मचार्‍यांना आपला जीव गमवावा लागला. रात्र-दिवस पोलिस रस्त्यावर उभे आहेत, कित्येक पोलिस कोरोनाने मरण पावले. दुसर्‍या लाटेचं कोणालाच काही वाटलं नाही. उगीच काही तरी केलं जातं? कोरोना नाही, लोकांना वेठीस धरले जाते? अशा अफवा आणि बाष्कळ चर्चा काल ही होत होत्या आणि आज ही होत आहेत, मग ते मनोहर भिडे असतील किंवा अन्य कुणी असतील? जेव्हा भिडे सारखे लोक आजारी पडतात. तेव्हा मात्र ते गुपचीप रुग्णालयात दाखल होत असतात? जे लोक म्हणत आहेत, कोरोना नाही, त्यातील अनेकांना कोरोनाने घेरले. कोरोना किती खतरनाक आहे याची त्यांना प्रचीती रुग्णालयात अ‍ॅडमीट झाल्यानंतर येते हे तितकेच खरे आहे. काहींना सैम्य लक्षणे असतात. त्यामुळे त्यांना तितका त्रास होत नाही. काही जण रुग्णालयात दाखल होण्यास हालजर्गीपणा करतात, त्यामुळे त्यांची प्रकृती खालवत जाते. जेव्हा प्रकृती चांगलीच बिघडते,तेव्हा रुग्णालयात धाव घेतली जाते. हालगर्जीपणामुळे अनेकांचा जीव गेलेला आहे हे मान्य करावे लागेल आणि काहींनी विनाकारण धास्ती खाल्ली त्यामुळे काही जण मरण पावले हे ही खरे आहे. कोरोनाला धैर्यानेच सामोरे जावे लागेल, ते धैर्य प्रत्येकाकडे असले पाहिजे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


लोकांचा जीव महत्वाचा नाही का?
राजकारणी आपल्या स्वार्थासाठी लोकांचा जीव धोक्यात घालतात हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनावरुन दिसून येतं. कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहित होतं. विशेष करुन आरोग्य विभागाने तसा वेळोवेळी इशारा दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं ही प्रत्येक राज्याची आणि विशेष करुन केंद्राची जबाबदारी होती, पण योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. दुसरी लाट येणं आणि पाच राज्यातील निवडणुका घोषीत होणं एकच झालं. निवडणुका काही महिने पुढे ढकलता आल्या असत्या, मात्र तसं करण्यात आलं नाही. निवडणुका म्हटलं की पुढार्‍यांना भरतीच येते. निवडणुका जिंकण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून पाच राज्यात पुढार्‍यांनी प्रचाराचा धुमाकूळ सुरु केलेला आहे. प्रचार आजही सुरुच आहे. प्रचाराच्या सभांमध्ये हजारो लोकांची गर्दी असते. गर्दीमध्ये कुठलेही नियम पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास चांगलेच पोषक वातावरण निर्माण झाले. देशातील महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली यासारख्या राज्याची परस्थिती वाईट आहे. लोकांना अ‍ॅडमीट करण्यासाठी कॉट शिल्लक राहिले नाही. ऑक्सीजन विना अनेकांचा जीव गेला. स्मशानभुमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी थांबण्याची वेळ आली. एकाच चितेवर अनेकांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. ही खुपच भयानक परस्थिती निर्माण झाली. असं असतांना केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी पाच राज्ये पिंजुन काढले आणि कोरोनाला वाढण्यास मदत केली आहे. आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी कसं लोकांना तोफेच्या तोंडी दिलं जातं असंच पाच राज्यातील निवडणुकीच्या प्रचारातून निष्कर्ष काढला जात आहे.


राजकारणाला काही मर्यादा असतात
राजकारण कुठं करावं आणि कधी करावे याचं याला काही मर्यादा आहे की नाही? राज्यात भाजपाची सत्ता नाही याचा अर्थ राज्यावर केंद्राने अन्याय करायचा का? राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलीक यांनी केंद्रावर पक्षपाताचा आरोप केला. 16 निर्यातदाराकडे रेमडेसिवीरच्या 20 लाख कुप्या आहेत, पण त्यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्रात पुरवठा करु नये, तसे केल्यास परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी केद्रांने दिल्याचा आरोप मलीक यांनी केेला. अशा पध्तीने राजकारण होत असेल तर हे खुपच अवघड आणि गंभीर आहे. महाराष्ट्रात माणसं राहत नाही का? केंद्र सरकार मढ्यावरचं लोणी खावू लागले असचं यातून दिसतं. राज्यातील काही नेते केंद्रात आहेत. जावडेकर, गोयल, नितीन गडकरी ते ही आपल्या राज्यातील जनतेसाठी काही करु शकत नाही का? भले ते भाजपाचे असले तरी संकटात जात,पात, धर्म, पक्ष बघायचा असतो का? उठसुट भाजपाने मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याऐवजी आपलं केंद्रात वजन वापरुन औषधांचा साठा राज्याला कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राजकारण ऐरवी ही करत येतं याचं भान पुढार्‍यांनी ठेवायला हवं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा


आरोग्य महत्वाचं
कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणुन गर्दी टाळायला हवी असे रोज सांगितले जाते, मात्र या नियमाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. धामिर्र्क कार्यक्रमावर काही निर्बंध लादण्यात आले. असे असतांना निर्बधाबाबत दखल घेतली जात नाही. हरीद्वारमध्ये कुंभमेळा होत आहे. यात मोठी गर्दी उसळली. कोरोनाच्या काळात इतकी मोठी गर्दी म्हणजे आणखी कोरोनाच्या फैलावाला पोषक वातावरण निर्माण करणं असचं आहे. या मेळाव्याचं मुख्यमंत्री रावत यांनी समर्थन केल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे. कोरोना हा काही जात,पात,धर्म पाहून थोडाच होतो. तो फक्त माणुस पाहतो. देशात एवढं मोठं सकंट आलं असतांना त्या संकटावर मात करण्यासाठी जी नियमावली तयार केलेली आहे. त्याला पायदळी तुडवायचं म्हणजे हा ‘ओव्हपणा’ झाला. मग असे मेळावे कोणत्या ही जाती-धर्माचे का,असेना? त्यावर निर्बध लादलेच पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी प्रतिकात्मक मेळावा घेण्याचे आवाहन केल्यानंतर ही त्यांचे कुणी मनावर घेतले नाही हे विशेष आहे. पहिल्या लाटेत दिल्लीचे निजामोद्दीचं प्रकरण खुपच गाजवण्यात आले होते. तबलीगी मेळाव्याला ‘बॉम्बर’ ‘दहशतवाद’ यासारखे विश्‍लेषणं लावून एक महिना भर टीव्ही चॅायनलवाल्यांना खुराक मिळाला होता. यात काही राजकारण्याने वेगवेगळे वक्तव्ये करुन कोरोनात जाती,धर्माच्या भींती उभ्या करण्याचे काम केले होते. जाणीवपुर्वक असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अपत्तीच्या काळात कोणताही धर्म असो त्याने सहकार्याची भावना ठेवली तरच कोणत्याही अपत्तीवर सहज मात करता येवू शकते. कुरघोडी केल्याने काहीच साध्य होत नसतं. उलट कुरघोडीची लढाई माणसात वैर निर्माण करुन आराजकतेला आमंत्रण देत असते. आजच्या काळात लोकाचं आरोग्य महत्वाचं आहे हे माणसांनी लक्षात ठेवायला हवं. धर्म बाजुला ठेवून नियम पाळले पाहिजे. आज माणुस महत्वाचा आहे धर्म नाही. माणुसच राहिला नाही तर

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

धर्म राहिल का?
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी
आजच्या घडीला माणुस वाचवणं हेच सर्वात मोठं पुण्याचं काम आहे. कोरोनाची लाट कधी ओसरेल या बाबत तज्ञ ही काही ठोसपणे सांगू शकत नाहीत. काळजी घ्या इतकं ते सांगत असतात. रुग्णांची संख्या वाढत असल्याने याचा ताण आरोग्य प्रशासनावर पडू लागला. देशाची आरोग्य व्यवस्था खुपच चांगली आहे असं म्हणता येणार नाही. कारण आता पर्यंत आरोग्य व्यवस्थे बाबत उदासीनताच दाखवण्यात आली. सत्तर वर्षात आरोग्यावर विशेष भरीव तरदूत करण्यात आली नाही. सरकारी दवाखाने तितके सक्षम नाहीत. त्यामुळे ऑक्सीजन बेड कमी पडू लागले. रुग्णांना ऑक्सीजन मिळणं अवघड होवून बसलं. त्यातच रेमडेसीवर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला. जेव्हा एखाच्या वस्तूचा तुटवडा होतो. तेव्हा त्यात माफीयागिरी घुसते. त्याचा काळाबाजार सुरु होतो. तसाच रेमडीसीवरचा काळाबाजार सुरु झाला. अनेक ठिकाणी अव्वाच्या सव्वा दराने हे औषध विकले जावू लागले, हे औषध रुग्ण मध्यमस्टेजवर किंवा गंभीर असल्यावरच दिलं जातं. नॉर्मल रुग्णासाठी या इंजेक्शनची गरज नाही. मात्र सध्या या इंजेक्शनची देशात चर्चा सुरु झाली. सात ठिकाणी या औषधाची निर्मीती केली जाते. सदरील औषध विक्रेत्यांनी माणुसकीचा धर्म पाळूनच औषधाची विक्री केली पाहिजे. कोरोनाने अर्थव्यवस्थेची पुर्णंता वाट लावून टाकली. आज माणसं जगवण्याचं सर्वात मोठं आव्हान शासन,प्रशासना समोर आहे. आणखी तिसरी लाट येतीय की काय असा ही धोका व्यक्त केला जावू लागला. कोवीड सेंटर जागो-जागी सुरु करण्याची वेळ आली. प्रत्येक तालुक्यात सेंटर असले तरी रुग्ण वाढले तर गावो-गावी कोवीड सेंटर सुरु करावे लागतील. हा किती मोठा आरोग्य विभागावर ताण असेल? एक तर लोक नियमाचं पालन करत नाही. शासनाचे आदेश पायदळी तुडवतात. दुसरीकडे पुढारी आपल्याच मुडमध्ये असतात. त्यांना लोकांचं तितकं देणं-घेणं नाही. आज आरोप-प्रत्यारोप करण्यातच पुढारी वेळ काढूपणा करत आहेत. केवळ गाफीलपणामुळेच कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी सर्वाच्याच प्रयत्नाची गरज आहे, ही जागतीक महामारी आहे. याचं भान असायला हवं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

error: Content is protected !!