Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाऑक्सिजनच्या तुटवड्याने एसआरटीत रात्रभर धावपळ रेशनसाठी, रॉकेलसाठी रांगा लावाव्यात तशा ऑक्सिजनसाठी रांगा...

ऑक्सिजनच्या तुटवड्याने एसआरटीत रात्रभर धावपळ रेशनसाठी, रॉकेलसाठी रांगा लावाव्यात तशा ऑक्सिजनसाठी रांगा लावण्याची वेळ

आ.दौंडांसह एसआरटी
प्रशासन रात्रभर जागे;
सकाळी आले ऑक्सिजन
सायंकाळपर्यंत
दौंडांच्या प्रयत्नातून एसआरटीमध्ये येणार ऑक्सिजनचे टँकर

बीड/अंबाजोगाई । रिपोर्टर
टंचाईच्या काळात रॉकेलसाठी, राशनसाठी आणि नोटबंदीच्या काळात पैशासांठी बँकांसमोर जशा रांगा लावून आपली मागणी पुर्णत्वाकडे न्यावी लागत होती तशी परिस्थिती बीड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर रेमडिसीवीरसह ऑक्सिजन बाबत निर्माण झाली. कोरोना बाधितांच्या रुग्णांसह गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांचा आकडा वाढत चालल्यान ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण होत असून रात्री एसआरटीमध्ये ऑक्सिजन कमी पडणार हे लक्षात आल्यानंतर तेथील प्रशासनासह विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी रात्र जागून काढत ऑक्सिजनची व्यवस्था केली. दुसरीकडे लातूरच्या एजन्सीवरून ऑक्सिजन आणण्यासाठी एसआरटीचे डेप्युटी डिन राजेश कचरे, डॉ. सुधीर पडवळ, संतोष गोडबोले या तिघांना जणू काही लाईनीत उभा केले. हे सर्व परिस्थितीचे गांभीर्य दाखवणारे उघड जळजळीत सत्य सध्या कोरोनाने दाखवून दिले आहे.


अंबाजोगाईच्या एसआरटी सेंटरमध्ये रात्री वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही त्यामुळे पाच-सात तास पुरेल एवढेच ऑक्सिजन उपलब्ध होते. 225 पेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजनवर असल्यामुळे एसआरटी प्रशासनाची झोप उडाली. ऑक्सिजन आणायचे कुठून? रोज पाचशे ते साडेपाचशे जम्बो सिलिंडर एसआरटीला लागते. रोज 300 ते 350 सिलिंडर लातूर देते, शंभर ते दीडशे बीडवरून उपलब्ध होते, परंतु रात्री परिस्थिती बिकट झाली. रुग्णलायाचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी ऑक्सिजनसाठी प्रयत्न केले. विधान परिषदेचे आमदर संजय दौंड यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, पालकमंत्री यांच्यासह लातूरच्या संबंधित एजन्सीसोबत संपर्क केला. अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनी जागून एसआरटीला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. लातूरच्या नाना एजन्सीमधून हे ऑक्सिजन उपलब्ध झाले. मात्र अद्यापही एसआरटीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आज दुपारपर्यंत ऑक्सिजनचे टँकर येणे अपेक्षित आहे. आ.संजय दौंड हे यावर लक्ष ठेवून असून अंबाजोगाईला मोठ्या प्रमाणावर पेशन्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करावी.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची
व्यवस्था स्वत: करावी-जिल्हाधिकारी

ias rajendr jagtap beed

राज्य सरकारने औद्योगिक उत्पादनातला गॅस कोरोना रुग्णांसाठी देण्यात येत आहे. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद येथून खासगी दवाखान्यांनी एकत्रित येऊन गॅस उपलब्ध करून घ्यावा, त्यासोबतच रुग्णांनीही आणि खासगी दवाखान्यांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जगताप यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी बीडचे नाहीत जिल्ह्याचे आहेत-दौंड

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
sanjay daund

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे आजच्या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची व्यवस्था तिकडून करा, म्हणतात ‘ते नुसते बीडचे नाही तर तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, आजपर्यंत ते केवळ एकच वेळेस अंबाजोगाईत आले, हे दुर्दैव, जिल्हाधिकार्‍यांनी ऑक्सिजन, रेमडिसीवीर याची व्यवस्था करायला हवी, तुम्ही रेमडिसीवीर द्या, आम्ही ऑक्सिजन देतो’, ही जिल्हाधिकार्‍यांची भूमिका योग्य नाही, असे म्हणत आ. संजय दौंड यांनी नाराजी व्यक्त केली.

आज जिल्ह्यामध्ये 300 रेमडिसीवीर इंजेक्शन
अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 300 रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्द झाले असून ते लवकरच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे देण्यात येणार आहेत. सरकारी दवाखाना सोडता बीड शहरातील खासगी दवाखान्यात प्रत्येक दिवशी 1200 रेमडिसीवीर इंजेक्शनची आजच्या तारखेत गरज असताना फक्त 300 रेमडिसीवीर आलेले आहेत. त्यामुळे रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे.

खासगी रूग्णालय
ऑक्सिजनसाठी अडचणीत

ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आपले माणसे खासगी ऑक्सिजन एजन्सीवर बसवून ठेवत खासगी रूग्णालयाला दोन किंवा तीनच सिलेंडर रोज द्या असे सांगण्यात येवू लागल्याने खासगी रूग्णालय ऑक्सिजनसाठी अडचणीत आले आहे. बीडमधील एका खासगी रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होतो की नाही या भितीने रूग्ण अन्यत्र हलवा अशा सूचना देण्यात आल्या. संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता ते डॉक्टर म्हणाले, आम्ही खासगी एजन्सीकडून ऑक्सिजन घेतो परंतू आता जिल्हाधिकार्‍यांनी तिथे माणसे ठेवली आहेत. आमच्याकडे ऑक्सिजनच नसेल तर पेशंटच्या जिवाशी आम्ही खेळणार नाहीत. जिल्हाधिकार्‍यांनी सरकारी, खासगी न पाहता बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक दवाखान्यात ज्याला ऑक्सिजनची गरज आहे त्याला ऑक्सिजन कसं पुरवलं जाईल याकडे पाहुन ऑक्सिजन उपलब्ध करावं, जबाबदारी झटकून चालणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

error: Content is protected !!