Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोविड बाबत आ. पवारांची रात्री 10 वा. तहसिल कार्यालयात बैठक

कोविड बाबत आ. पवारांची रात्री 10 वा. तहसिल कार्यालयात बैठक

प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा
गेवराई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आमदार लक्ष्मण पवार यांनी दि.20 रोजी रात्री 10 वा. तहसील कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावरून आ.पवार हे तालुक्यातील जनतेच्या काळजी पोटी रात्रंदिवस काम करत असल्याचे दिसून येत आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

दरम्यान तहसिल कार्यालयात झालेल्या या बैठकीला तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक चिंचोळे, डॉ.राजेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ.लक्ष्मण पवार यांनी तालुक्यातील कोविड चैन तोडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असून यासाठी विशेष यंत्रणा राबवावी लागेल यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या. तसेच तालुक्यातील बेडची संख्या वाढवणे, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, लसीकरण यासह विविध विषयांवर चर्चा करत सविस्तर आढावा घेतला. तसेच याबाबत तुटवडा असलेल्या यंत्रणेबाबतचे
मागणी अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करावेत या बाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करून तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत विनाकारण बाहेर फिरू नये व आपली व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षापुढील नागरिकांनी लस टोचून घ्यावे असे आवाहन केले. या बैठकीत सर्व उपस्थित अधिकार्‍यांनी आपापल्या विभागाचा सविस्तर आढावा आ.पवार यांना सादर केला असता पुढील उपाययोजना व नियोजना बाबत त्यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!