Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाप्राणवायु नाही, जीव कंठाशी, परिस्थिती चिंताजनक, आता राजकारण नको

प्राणवायु नाही, जीव कंठाशी, परिस्थिती चिंताजनक, आता राजकारण नको

एसीत बसून बाबूगिरी नको, कागदी घोडे नको, अधिकार्‍यांनो-पुढार्‍यांनो रात्रीचा दिवस करा, लोकांचा जीव वाचवा
बीड (रिपोर्टर):- रेमडीसीवीरच्या प्रचंड तुटवड्याने रुग्णांचे नातेवाईक ते मिळवण्यासाठी दिवसाची रात्र करत धावपळ करत असताना गेल्या दोन दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवू लागल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे जीव कंठाशी येऊन बसले आहे. आता ऑक्सिजनसाठी पळापळ करावी लागत आहे. खासगी रुग्णालयेही ऑक्सिजन नाही, तुमचा रुग्ण इतरत्र हलवा, असे सांगू लागल्याने विदारक सत्य समोर येत आहे. आता राजकारण नको, एसीत बसून बाबुगिरी नको, कागदी घोडे नाचवणे नको, अधिकार्‍यांनो, पुढार्‍यांनो दिवसाची रात्र करा, लोकांचे जीव वाचवा.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार उडवून दिल्याने जो तो चिंताक्रांत होऊन बसला आहे. रेमडिसीवीर इंजेक्शनसह ऑक्सिजनचा तुटवडाही जिथे तिथे होत आहे. ऑक्सिजन तुटवडा हा केवळ अव्यवस्थापनातून होत असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. 1600 पेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यातल्या बहुतांशी खासगी रुग्णालयात गंभीर आणि अतिगंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्याभरात रेमडिसीवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ आणि धावपळ सुरू असायची, मात्र गेल्या दोन दिवसांपासून अंबाजोगाई, आष्टी आणि अन्य ठिकाणी ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन कमी पडू लागल्याने डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण इतरत्र हलवण्याबाबत सांगत आहेत. ही गंभीर परिस्थिती सध्या बीडमध्ये दिसून येत आहे. आता राजकारण नको, आपला तुपला नको, बाबुगिरी नको, कागदी घोडे नाचवणे नको, अधिकार्‍यांनो-पुढार्‍यांनो रेमडिसीवीरसह ऑक्सीजनचा पुरवठा कसा होईल, ऑक्सिजनचे उत्पादन कसे करता येईल याकडे लक्ष द्या, वेळेचे महत्व समजून घ्या, तहान लागल्यावर विहिर खांदू नका, लोकांचे जीव आता तुमच्या हातात आहेत. प्रशासनातले अधिकारी आणि शासनातले पुढारी हे आज सर्वसामान्य नागरिकांसाठी देव आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!