Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाremdisivar-आ.धसांनी जिल्हाधिकार्‍यांना जाब विचारला म्हणाले, मी काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का?

remdisivar-आ.धसांनी जिल्हाधिकार्‍यांना जाब विचारला म्हणाले, मी काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का?


बीड (रिपोर्टर) मी काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय? आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय? असा संतप्त सवाल करत आ.सुरेश धस यांनी आज जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनातल्या अधिकार्‍यांना रेमडिसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने धारेवर धरले. लोक दिवस रात्र रेमडिसीवरसाठी इकडे तिकडे फिरत आहेत. आणि तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत आहात. अन्न व औषध प्रशासनाचे हाश्मी आणि डोईफोडे प्रायव्हेट रूग्णालयातले इंजेक्शन जप्त करत आहेत ते कुठे जात आहेत? असा सवाल करत क्रियाशील असलेले सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आज गणपत पाटलाचे मावसभाऊ झाल्यासारखे वाटत आहे अशी हताश प्रतिक्रिया आजच्या परिस्थितीवर आ.धसांनी दिली.उद्यापर्यंत रेमडिसीवर इंजेक्शन व्यवस्थीतपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू. असा इशारा आ.सुरेश धस, लक्ष्मण पवार यांच्यासह बहुजन वंचित आघाडीचे अशोक हिंगे, एमआयएमचे पदाधिकारी नगरसेवक सह अन्य उपस्थित पदाधिकारी नागरिकांनी दिला.

बीड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांना रेमडिसीवरचे इंजेक्शन मिळत नाही. अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि रेमडिसीवरचा होत असलेला काळाबाजार व प्रशासनाचा बेजबाबदारपणाचा जाब विचारण्यासाठी आ.सुरेश धस यांच्यासह अन्य छोट्या मोठ्या पक्षाचे नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमोर सर्वांनीच आक्रमक होत रेमडिसीवर मिळत नसल्याची तक्रार केली. यावेळी आ.सुरेश धस प्रचंड संतापले. ते म्हणाले, मी काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे का? आष्टी पाटोदा शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय? काय दाखवता तुम्ही अर्ज? कागदी घोडे नाचवणे बंद करा, कलेक्टर साहेब आमच्या सर्वांवर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आणि जेलमध्ये टाका, बाहेर जाण्यापेक्षा जेलमध्ये जावून बसलेले बरे. खोटे बोलताय हा हाश्मी..म्हणतोय सहा..व्हॉट इज थीस हाश्मी..रूग्णाला सांगताय इथून तिथे या…तुमचे कागदं काळं बघायचे का…चार चार दिवसापासून रेमडिसीवर मिळत नाही. यावेळी अन्य उपस्थित पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर संताप व्यक्त केला. जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा झाल्यानंतर आ.सुरेश धस व अन्य पक्षाचे पदाधिकारी बाहेरील माध्यमांशी बोलले. यावेळी सुरेश धस म्हणाले की, हे नुसते याद्या करतात, एक इंजेक्शन भेटत नाही, इथे सर्व पक्षीय राज्यकर्त्यांचे आणि पुढार्‍यांचे हाल गणपत पाटलाचे मावस भावासारखे झाले आहे. इतिहासात पहिलेवेळी लोक काहीतरी मागत आहेत आणि आम्ही देवू शकत नाही. रेमडिसीवरसाठी रोज फोन येत आहेत. परिस्थिती पाहून र्‍हदयाचे ठोके वाढू लागले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता हाश्मी आणि डोईफोडे यांच्याकडील अधिकार काढून धरमकर यांच्याकडे दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. नक्कीच आजच्या या परिस्थितीवर आमच्या लोकांनी मन मोठं करून आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, पालकमंत्री, विभागीय आयुक्त यांनी रेमडिसीवर बाबत प्रयत्न केले. त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतू रेमडिसीवीर कुठेय? काही करा रेमडिसीवीरची व्यवस्था करा, लोकांचे जीव रेमडिसीवीर अथवा ऑक्सीजनमुळे जावू नये. उद्यापर्यंत रेमडिसीवर इंजेक्शन व्यवस्थीतपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू. असा इशारा आ.सुरेश धस, लक्ष्मण पवार यांच्यासह बहुजन वंचित आघाडीचे अशोक हिंगे, एमआयएमचे पदाधिकारी नगरसेवक सह अन्य उपस्थित पदाधिकारी नागरिकांनी दिला.

Most Popular

error: Content is protected !!