Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाआमदार सुरेश धस यांची संपुर्ण मतदार संघातील गावो-गावी, खेडो-पाडी अँटीजन टेस्ट व...

आमदार सुरेश धस यांची संपुर्ण मतदार संघातील गावो-गावी, खेडो-पाडी अँटीजन टेस्ट व आधार जनजागृती मोहीम


बीड (रिपोर्टर):- मतदारसंघात कोरोनाचा कहर वाढतंच आहेत, कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आमदार सुरेश आण्णा धस त्यांच्या कुटुंबातील सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गणप्रमुख, प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ता गावात जाऊन गावकर्‍यांना अँटीजन टेस्ट करण्यासाठी जागृत करून हा रोग अंगावर काढण्यासारखा नाही, भीती,बाळगू नका,सर्दी, खोकला, सर्दी-ताप,अंगदुखी डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळून आल्यास लवकरात लवकर जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण / खाजगी रुग्णालयात जाऊन योग्य तो उपचार सुरू करावा.
   कोरोनाच्या महामारीत ग्रामीण भागातील लोक जास्त भीती बाळगत आहेत, कृपया कुठलीही भीती न बाळगता आपण अँटीजन टेस्ट  आ.सुरेश आण्णा धस, मच्छिन्द्रनाथ देवस्थान,आष्टी तालुका दूध संघ,आ. सुरेश धस मित्र मंडळ यांच्या संयुकत्त विद्यमाने स्वखर्चाने अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहेत. तुम्हाला कोरोनाचे संक्रमण झाले म्हणून धीर सोडू नका,तुम्हा सर्वांचा आधारवड आमदार सुरेश आण्णा धस आपल्या सर्वांसाठी दिवसरात्र आरोग्य प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चेत आहेत, आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही,कुठलाही संकोच असेल तर आ.सुरेश  आण्णा धस,भारतीय जनता पार्टी, त्याचे कुटुंब,प्रमुख कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत.
आमदार सुरेश आण्णा धस यांनी सुरु केलेल्या  जनसामान्य आधार-जनजागृती या मोहिमेत सर्वसामान्यांची सेवा करण्याची आपल्यासाठी एक संधी आहे,यामध्ये कुठलाही संकोच मनामध्ये न ठेवता सामान्य जनतेच्या मदतीला आम्ही उभा व सोबत आहोत  असे आवाहन लोकनेते आ.सुरेश धस यांनी केले आहे.
शुक्रवार दि.23 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून आष्टी, पाटोदा, शिरूर, मतदारसंघात दौरा सुरू केला आहे.त्यामध्ये आज लोणी, बोरोडी,पिंपळगाव दाणी, ङ्गत्तेवडगाव या गावाच्या प्रामुख्याची भेट घेऊन आ.सुरेश आण्णा धस यांनी आधार -जनजागृतीबद्दल माहिती देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी घ्या,काळजी करू नका असा आधार यांनी दिला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!