Thursday, December 3, 2020
No menu items!
Home क्राईम परळीतून व्यापार्‍यांचे २५ लाख दिवसाढवळ्या पळविले

परळीतून व्यापार्‍यांचे २५ लाख दिवसाढवळ्या पळविले


चालक समोसे आणण्यास जाताच चोरट्यांनी डाव साधला

परळी (रिपोर्टर)- औरंगाबादच्या व्यापार्‍याने वसुली करून आणलेले २५ लाख रुपये चारचाकी गाडीमध्ये ठेवले होते. अन्य वसुली करण्यासाठी ते गेले होते. गाडीत चालक होता मात्र चालकाने पैसे सोबत न नेता पैसे गाडीत ठेवून तो समोसे आणण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी गाडीतील २५ लाख रुपये लांबविले. ही घटना आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत घडली.
संजय गंगावले हे औरंगाबादचे व्यापारी अंबाजोगाईहून परळीला वसुलीसाठी आले होते. आतापर्यंतचे वसुलीचे पैसे जवळपास २५ लाख रुपये त्यांनी गाडीमध्ये ठेवले आणि इतर ठिकाणची वसुली करण्यासाठी ते परळी शहरामध्ये गेले होते. गाडीत चालक होता. चालक पैसे गाडीत ठेवून समोसे आण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी डाव साधत गाडीतील २५ लाख रुपये पळविले. परत आल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती परळी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...