Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाना फवारणी ना जनजागृती केवळ श्रेयवादाची टाळकुटी, शहरात कोरोना वाढतोय, नगराध्यक्ष कुठायत?

ना फवारणी ना जनजागृती केवळ श्रेयवादाची टाळकुटी, शहरात कोरोना वाढतोय, नगराध्यक्ष कुठायत?

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत असून यामध्ये बीड शहरासह तालुक्यात सातत्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. रोज दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्यानंतरही बीड नगरपालिका मात्र कोरोनाला रोखण्यासाठी शहरात कुठलीही उपाययोजना करताना दिसून येत नाहीत. केवळ श्रेयवादाच्या राजकारणात रस दाखवणारे नगरपालिकेचे अध्यक्ष आपल्या कर्तव्य-कर्माकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
   गेल्या पंधरा दिवसांपासून रोज बीड शहरात आणि तालुक्यात दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यापुर्वी मार्च महिन्यातही बीड शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. समुहसंसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या बेशिस्तीवर बोट ठेवत प्रशासन व्यवस्था काम करत आहे. आरोग्य व्यवस्था आपले कर्तव्य अत्यंत नम्रपणे करत असतानाच बीडची नगरपालिका मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालखंडात कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर फवारणी कुठेच केल्याचे दिसून आले नाही. शहराची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. शहरात कोरोना वाढू नये यासाठी जनजागृती करणे, फवारणी करणे यासह लोकांना आधार देणे हे नगरपालिकेचे काम आहे, परंतु श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेले नगराध्यक्ष कोरोनाला रोखण्यासाठी काहीच करत नसल्याचे दिसून आले आहे. केवळ श्रेयवादाच्या बातम्या छापून आणणे एवढेच उद्योग नगराध्यक्ष करत असल्याचा आरोप सर्वस्तरातून होत असून नगरपालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा आरोप आता होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!