Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeबीडसोनीहीवरा येथील 35 पॉझिटिव्ह रुग्णांना ‘लोखंडी’त बेड मिळाले नाही बेडअभावी घरीच...

सोनीहीवरा येथील 35 पॉझिटिव्ह रुग्णांना ‘लोखंडी’त बेड मिळाले नाही बेडअभावी घरीच उपचार घेण्याची वेळ

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गावागावात जावून अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांना दवाखान्यात बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. काल परळी तालुक्यातील सोनीहिवरा गावातील 35 जण अँटीजेन टेस्टमध्ये बाधित आढळून आले होते. त्यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये रात्री उशिरापर्यंत बेड मिळालेच नाही. शेवटी त्यांना पुन्हा घरी परतावे लागले.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने वाढू लागला आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजेन टेस्ट मोहीम गावागावात राबविली जात आहे. अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्या त्या भागातील कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला दिला जातो. त्या त्या सेंटरमध्ये गेल्यानंतर तेथे बेड शिल्लक नाही म्हणून बाहेर एक-दोन तास थांबवले जाते. पुन्हा बेड नसल्यामुळे ‘घरी जा’ असा फुकटचा सल्ला दिला जातो. परळी तालुक्यातील सोनीहिवरा गावात काल आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये 35 जण बाधित आढळून आले. ते 35 जण लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी गेले मात्र त्यातील एकालाही बेड मिळाला नाही. त्यातील दोघांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून ही आपबिती सांगितल्यानंतर केवळ त्या दोघांनाच बेड मिळाले. इतर 33 रुग्ण अद्यापही घरीच उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!