Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकरिअरजिल्हा रुग्णालयात मृतांच्या नावावरचे रेमडिसीवीर काळ्याबाजारात?

जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नावावरचे रेमडिसीवीर काळ्याबाजारात?


टाळूवरचे लोणी खाणारी ‘ती’ टोळधाड कोण? जिल्हाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत तपास करावा
बीड (रिपोर्टर):- रेमडिसीवीरबाबत ओरड सुरू असताना त्याचा काळा बाजारही समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातून रेमडिसीवीरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचा आरोप होत असतानाच गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडात जिल्हा रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या नावे असलेले रेमडिसीवीर इंजेक्शन नेमके गेले कुठे? त्या इंजेक्शनचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग शोध घेणार आहे का? खासगी रुग्णालयांनीही गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडात दोन डगरीवर हात ठेवून रेमडिसीवीरचा काळाबाजार केल्याचे बोलले जाते.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये रेमडिसीवीरचाी मारामार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कधी कोविड रुग्णालयाच्या मेडिकलला रेमडिसीवीर विकण्याचा अधिकार होता तर कधी जिल्हा रुग्णालयाला रेमडिसीवीर देण्याचा अधिकार देण्यात आला. या कार्यकाळामध्ये रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या तथाकथीत महाभागांचे चांगलेच फावले. रेमडिसीवीर अभावी आणि ऑक्सिजन अभावी गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडात बीड जिल्हा रुग्णालयात अनेक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. या बाधितांना रेमडिसीवीर इंजेक्शन देण्याबाबत सुचना होत्या. ज्या रुग्णांना एक किंवा दोन इंजेक्शन दिले आणि तो रुग्ण दुर्दैवीने या दरम्यान मृत्यूमुखी पडला. त्याच्या नावावर असलेल्या इंजेक्शनचा येथील स्टोअर किपर मुंडे नामक व्यक्तीने संगनमताने काळाबाजार केल्याची चर्चा होत आहे. खासगी रुग्णालयातही डॉक्टरांनी स्वत:च्या मेडिकलमधून इंजेक्शन देऊन रुग्णाच्या नातेवाईकाला जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन आणण्याबाबत चिठ्ठ्या दिल्याचाही प्रकार समोर येत आहे. त्यामुळे ‘हमाम मे सब नंगे’ प्रमाणे रेमडिसीवीरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार काल रात्री उघड झाला. म्हणून या प्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी मृतांच्या नावावर कोणी इंजेक्शन विकले का? याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी.

Most Popular

error: Content is protected !!