Sunday, October 17, 2021
No menu items!
HomeUncategorized‘मी एकटी आहे, तीन वाजले मला जेवण दिलं नाही’; लहान मुलीची आर्त...

‘मी एकटी आहे, तीन वाजले मला जेवण दिलं नाही’; लहान मुलीची आर्त हाक


पिसेगाव, शारदा इंग्लिश स्कूलमध्ये रुग्णांची हेळसांड
केज/बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवून सोडले आहे. अनेक रुग्ण वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. शासन-प्रशासन कोविड रुग्णांच्या उपचाराबरोबर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे मात्र पिसेगाव येथील कोविड सेंटरमध्ये आणि शारदा इंग्लिश स्कूल केज येथील कोविड सेंटरमध्ये बाधित रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असून एका चिमुकलीच्या व्हिडिओने या सेंटरमधील विदारक परिस्थिती समोर आली आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


पिसेगाव आणि शारदा इंग्लिश स्कूल केज येथील कोविड सेंटरमध्ये जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या आहेत मात्र अद्यापही त्यावर सुधारणा झालेली नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनीही या प्रकरणी तक्रार केली मात्र त्यानंतरही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते. आज एका मुलीने व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘मी एकटी आहे, बाबा घरी आहेत, तीन वाजले मला जेवण दिलं नाही, मला घरी जायचे आहे’ लहान मुलीची ही आर्त हाक जिल्हाधिकार्‍यांपर्यंत जाईल का? तिच्या उपचाराबरोबर पोटापाण्याची व्यवस्था होईल का? ज्या कंत्राटदाराला जेवण पुरवण्याचे कंत्राट दिले आहे ते याकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत. दुपारचे जेवण तीन ते चारला येते. रात्रीचे जेवण दहा ते अकरापर्यंत जाते. याकडेही जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देऊन आकस्मातपणे या कोविड सेंटरला भेट द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

Most Popular

error: Content is protected !!