Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडआदील पठाण बी.ई.केमिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

आदील पठाण बी.ई.केमिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण


बीड, (प्रतिनिधी):- सायं.दै.सिटीझनचे निवासी संपादक रफिक पठाण यांचे चिरंजीव आदील पठाण याने बी.ई.केमिकल इंजिनिअरिंगच्या फायनल वर्षात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केेले आहे. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आदीलने हे यश मिळविल्याबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
बीड येथील आदील मोहमंद रफिक पठाण हा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज प्रवरा नगर, लोणी येथे बी.ई.केमिकल इंजिनिअरींगच्या फायनल वर्षाच्या परिक्षेत डिटेक्शनमध्ये ८.८५ या विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. चार वर्षाच्या इंजिनिअरींग शिक्षणामध्ये आदीलने अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत यश मिळवलेले आहे. कुटुंबात कसल्याही प्रकारच्या उच्च शिक्षणाचा वारसा नसतांनाही आदीलने विशेष प्राविण्य मिळवल्याने त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!