Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमरेमडिसीवीरचा काळा बाजार; तीन आरोपी आज न्यायालायसमोर

रेमडिसीवीरचा काळा बाजार; तीन आरोपी आज न्यायालायसमोर

काळ्या बाजाराची माहिती पोलीसांना द्या
बीड (रिपोर्टर):- रेमडिसीवीरचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे औषध प्रशासनाकडून मात्र असे प्रकार होत नसल्याची ग्वाही देण्यात येत होती. परंतु रात्री तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर विकणार्‍या दोघांना रंगेहात पकडले. चौकशीअंती अन्य एक जण ताब्यात घेतला असून त्या तिघांकडून आणखी माहिती काढण्यासाठी शिवाजीनगर पोलीसांनी त्यांना न्यायालयात हजर केले आहे. आज त्यांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून रेमडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. याबाबत सातत्याने ओरड होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं. या प्रकरणी आता लोकांनीच काळाबाजार रोखण्यासाठी पाऊल उचलले असून काल एका सर्वसामान्य रुग्णाच्या नातेवाईकाने 22 हजार रुपयांना इंजेक्शन विकणार्‍या दोघांना माने कॉम्प्लेक्सजवळ पडून दिले. त्या दोघांची चौकशी केल्यानंतर आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले असून रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍यांमध्ये संतोष रावसाहेब नाईकवाडे (चाणक्यपुरी), प्रकाश परमेश्वर नागरगोजे (क्रांतीनगर), दत्ता महादेव निर्मळ हा खासगी रुग्णालयात कंपाउंडर रात्री पोलीसांनी पीपीई किटसह उचलून आणला. या प्रकरणात आणखी काळाबाजार करणारे मोठे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे. तिन्ही आरोपींना पोलीसांनी न्यायालयात हजर केले आहे. पुढील तपास पो.नि. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गुर्मे हे करत आहेत.
रेमडिसीवीरबाबत
माहिती द्या पो.नि.ठोंबरेंचे जनतेला आवाहन
बीड शहरामध्ये रेमडिसीवीर इंजेक्शनचा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी. आजपर्यंत रेमडिसीवीर काळ्या बाजारातून घेतले असेल तर त्याची माहितीही पोलीसांना देण्यात यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ठोंबरे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!