Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाआता बस्स झालं! धनुभाऊ, डॉ. गित्ते, राठोडला घरी बसवा, जिल्हा रुग्णालय जीव...

आता बस्स झालं! धनुभाऊ, डॉ. गित्ते, राठोडला घरी बसवा, जिल्हा रुग्णालय जीव वाचवणारे मंदिर की मृत्यूचा तांडव करणारा मसनवाटा


24 तासात बीड जिल्हा रुग्णालयात 16 रुग्णांचा मृत्यू
अज्ञात इसमाने वॉर्डाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला, ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला, नातेवाईकांचा आरोप
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयात नेमके काय चालू आहे? कोणाचं कोणाला ताळमेळ नाही, जिल्हा शल्यचिकित्सकांचा आणि आरएमओचा दवाखान्यावर ताबा नाही. कोविडसारख्या भयान संकटात रुग्णालयात कोणी काहीही करत चाललय. आज अज्ञात व्यक्तीने एका वॉर्डाचा ऑक्सिजन पुरवठाच बंद केला. त्यामुळे दोघांचे जीव गेले, असा आरोप नातेवाईकांनी केला. कालपासून आज दुपारपर्यंत बीडच्या जिल्हा रुग्णालयात तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरएमओ सुखदेव राठोड यांनी दिली. आता बास्स झालं धनुभाऊ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते आणि आरएमओ सुखदेव राठोडला आधी घरी बसवा. घर बसण्यासाठी त्यांना पगारा द्या, परंतु जिल्हा रुग्णालयाची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कार्यक्षम माणसे आणा, लोकात प्रचंड संताप आहे. सर्व काही असताना केवळ नियोजनाअभावी माणसे मरत असतील तर हे पाप नेमके कोणाचे असेल? हा सवाल उपस्थित करून लोक कायदा हातात घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यातला कोविड आटोक्यात आणण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. स्वत:ला दोन वेळेस कोरोना झालेला असतानाही लोकांशी संवाद साधत आहेत, बैठका घेत आहेत, ऑक्सिजनसह रेमडिसीवीर वेळेत मिळावं यासाठी धडपड करत आहेत. मात्र बीड जिल्हा रुग्णालयात ज्या पद्धतीने शल्यचिकित्सक आणि आरएमओ काम करत आहेत त्या कामामुळे लोकांचे जीव जात आहेत. जिल्हा रुग्णालयात नेमकं काय चाललं आहे, कधी रेमडिसीवीर समजून दुसर्‍यांचे इंजेक्शन पळवले जात आहेत, रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनचे सिलेंडर ताब्यात घेतात. पुरेसा स्टाफ नसतो, एकाच नर्सला तीन-तीन वॉर्डाची जबाबदारी दिली जाते आणि जबाबदार अधिकारी बिनदिक्कत घरी जावून झोपतात. त्यामुळे बीडच्या रुग्णालयामध्ये निष्पाप लोकांचे जीव जातात. डॉ. सुर्यकांत गित्ते आणि डॉ. सुखदेव राठोड यांच्या बेजबाबदार कार्यप्रणालीमुळे आज अज्ञात व्यक्तीने एका वॉर्डाची ऑक्सिजन पुरवठाच बंद केला. त्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यु झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याची कबुली आरएमओसह जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. परंतु ऑक्सिजनमुळे रुग्ण मेले नसल्याचे त्यांनी म्हटले. काल दि. 23 एप्रिलच्या सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बीडच्या रुग्णालयात तब्बल 16 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला. हा आकडा सांगतानाही जिल्हा शल्यचिकित्सकांना माहित नव्हते. शेवटी आरएमओला रिपोर्टरनेच काही नावे दिले तेव्हा त्यांनी खरा आकडा सांगितला. मृतांमध्ये 60 वर्षांपुढील नव्हे तर 38 ते 75 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय जीव वाचवणारं मंदिर आहे की, मृत्युचा थयथयाट करणारा मसनवाटा आहे. आता बास्स झालं धनुभाऊ या दोघांना घरी बसवा. 

चौकशी समितीचा
फार्स कशासाठी?

अज्ञात व्यक्तीने एका वॉर्डाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याची माहिती माध्यमातून आल्यानंतर कावरेबावरे झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी पुन्हा तोच फापट पसारा समोर मांडत या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केल्याचे उत्तर दिले. कसल्या चौकशी समिती स्थापन करताय? जो कोणी दोषी असेल त्याला अटक करा आणि आधी असल्या अकार्यक्षम जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरएमओला घरी पाठवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!