Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यातील कोविड वार्डात सर्व सुविधा उपलब्ध आहेत का? जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयाची पाहणी...

जिल्ह्यातील कोविड वार्डात सर्व सुविधा उपलब्ध आहेत का? जिल्हाधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयाची पाहणी करावी -अंबुरे

बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयाला कोविड वार्ड चालविण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात दोन ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना पाहता खासगी कोविड वार्डांमध्ये योग्य त्या सुविधा आहेत का याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी एक चौकशी समिती नेमावी तसेच काही ठिकाणच्या कोविड वार्डांंची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांनी केली.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

देशभरात कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णलय खचाखच भरलेले आहेत. त्यातच ऑक्सिजन अभावी काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यु झाला. नाशिक येथे ऑक्सिजन बंद पडल्याने त्या ठिकाणी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. विरार येथे आगीची घटना घडली. या घटना पाहता बीड जिल्ह्यातील कोविड वार्डची पाहणी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती जिल्हाधिकारी यांनी करावी तसेच स्वत: जिल्हाधिकार्‍यांनी काही कोविड वार्डांची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत का? रूग्णालयाचे ऑडीट होते का? याबाबतची माहिती घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!