Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाचला यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू

चला यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू

लोका हो, कोरोना गेला नाही, काळजी घ्या, फटाके वाजवू नका, अनेकांचे जीव गुदमरतायत, ऑक्सीजन घेण्यास त्रास होतोय, जिल्ह्यात आजपर्यंत शेकडो जणांचा जीव गुदमरून गेला, अनेक जणांना आजही श्‍वसनाचा त्रास, शेकडो रुग्ण आजही ऑक्सीजनवर, कोरोनाला गंभीरतेने घ्या, तो फुफ्फुसांवर हल्ला चढवतो, निमोनिया यमाच्या दारात नेतो, या दोघांशी दोन हात करायचे तर दिपोत्सव साजरा करा
बीड (रिपोर्टर)- कोरोना महामारीच्या सोबत असलेल्या निमोनियाच्या रोगाने आजपर्यंत शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जणांचा जीव आजही गुदमरत आहे. अनेक लोकांना ऑक्सीजनची मात्र कमी पडत आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी आजपर्यंत सर्वसामान्य माणसांनीही प्रयत्नांची परिकाष्ठा केली. सणोत्सव साध्या पद्धतीने साजरे केले. दिपावलीच्या सणात कोरोना आणि निमोनियाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी लोकांनी आता दक्ष राहणे गरजेचे असून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून दिपोत्सव साजरा करावा असे शासन-प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोरोना आणि निमोनियाशी दोन हात करण्यासाठी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी.
गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अवघ्या जगाला कोरोना महामारीने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात निमोनियासारखा आजार जीवघेणा झाला असून बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना आणि निमोनिया आजाराने शेकडो लोकांचा बळी गेला आहे. आजही बीड शहरासह जिल्हाभरात बरे होऊन आलेले शेकडो रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. त्यांचा जीव आजही गुदमरत आहे. कोरोना थेट फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने आणि निमोनिया फुफ्फुसाला डॅमेज करू लागल्याने श्‍वसनाच्या आजारात प्रचंड वाढ झाली असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा स्थितीत प्रदुषण वाढणार नाही, श्‍वसनाचा आजार असलेल्या बाधितांना त्रास होणार नाही, नवीन श्‍वसनाचे आजार होणार नाहीत यासाठी आता बीड जिल्ह्यातील जनतेने जागरुक राहणे गरजेचे आहे. आजपर्यंत सर्व जाती-धर्मांनी आपआपले सणोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने आनंदात साजरे केले. दिवाळी हा सर्वात मोठा सण असून या सणादिवशी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी होते. त्यातून निघणार्‍या धुराने प्रदुषण वाढते आणि हा धूर श्‍वासनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी, असे आवाहन शासन-प्रशासन व्यवस्थेकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आपली जबाबदारी म्हणून जिल्ह्यातील जनतेनी या वर्षीची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी, दिवाळीचा सण हा दिपोत्सवाचा सण आहे. दिपोत्सव साजरा करून कोरोनाने अंधारमय केलेल्या परिस्थितीला प्रकाशमय केले तर ते जनतेच्या आरोग्यासाठी हिताचे ठरेल.

कोर्ट म्हणतं, फटाक्यांपेक्षा माणसांचे जीव महत्वाचे
कोलकाता हायकोर्टात फटाक्याच्या बंदीविरोधातील याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होताना कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावत सणोत्सव महत्वाचे आहेत. परंतु माणसांचे जीव अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करावी.

polution

फटाका फुटल्यानंतर निघालेल्या धुरातून, गॅस, लेक मॅटर्स निघतो त्यामुळे प्रदुषण होते आणि ऑक्सीजन घ्यायला त्रास होतो -डॉ.थोरात
फटाके उडवल्यानंतर त्याच्यातून जो गॅस, धूर निघतो, लेक मॅटर्स ते पॉल्युशन वाढवतात. ते आपल्या हृदयात गेल्यानंतर इम्युनिटी कमी करते, लंग्स्‌ची कॅपिसिटी कमी होते. त्याच्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तर ती आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. फटाक्यातून निघालेले वायू तुमच्या-माझ्यासारख्या धडधाकट माणसाला श्‍वसनाचा त्रास देतात. आतातर आपल्याकडे कोरोनाचे अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. निमोनियाचे अनेक रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत मात्र त्यांना श्‍वसनाचा काही प्रमाणात त्रास आहे. अशा लोकांना फटाक्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाके न वाजवता प्रदुषणमुक्त साजरी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशो थोरात यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!