बीड (रिपोर्टर) शेतकरी कुटुंबातील वकील असलेल्या बेग हाशीम मोहम्मद यांनी नुकतेच एमपीएससीची परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन केले असून ते न्यायाधीश झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या माळापुरी येथील शेतकरी कुटुंबातील बेग हाशीम मोहम्मद हे बीडच्या न्यायालयात काही वर्षांपासून वकिली करतात. मार्च महिन्यात न्यायालयअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये बेग हाशीम हे उत्तीर्ण झाले आहेत. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.