Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeक्राईमरोडरॉबरी, घरफोडी करणारे दोन कुख्यात गुंड हद्दपार

रोडरॉबरी, घरफोडी करणारे दोन कुख्यात गुंड हद्दपार


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यासह अंबड तालुक्यात रोडरॉबरी, घरफोडी करून दहशत पसरवणार्‍या दोन कुख्यात गुंडांना बीड पोलीसांनी हद्दपार केले आहे.


आकाश ऊर्फ बाबू श्रीराम जाधव (वय 22, रा. गेवराई), सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते (वय 24, रा. गेवराई) या दोघांनी बीड जिल्ह्यासह अंबड येथे मोठ्या प्रमाणात घरफोड्या, रोडरॉबरीचे गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात आणि अंबड तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे बीड पोलीसांनी त्यांच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. काल स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुल्लत, जगताप, तांदळे, बांगर, विकास वाघमारे यांनी या दोघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!