Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोना‘रोम जळताना नीरो व्हॉयलीन वाजवत होता’

‘रोम जळताना नीरो व्हॉयलीन वाजवत होता’


मुंबई (रिपोर्टर):- देशभरात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्ण संख्या वाढत होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे या मुद्याला दिले. तर या निवडणुकीत मोदी आणि शाह या दोघांनी मिळून 294 सभा घेतल्या. तर एका बाजूला करोना वाढताना, मोदी नीरोसारखं वागत होते. रोम जळताना नीरो व्हॉयलीन वाजवत होता. तसं मोदी यांच लक्ष बंगालवर होते, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे बांगलमध्ये पुन्हा तृणमुल काँग्रेसने तिथे सरकार स्थापन करावं, अशी आमची अपेक्षा असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू सांगितले. त्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहे. यातून काय हे काय साध्य करीत आहे, अशा शब्दात केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर आंबेडकरांनी निशाणा साधला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!