Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनागेल्या चोवीस तासात बीड रुग्णालयात 10 तर स्वारातीत 9 जणांचा मृत्य

गेल्या चोवीस तासात बीड रुग्णालयात 10 तर स्वारातीत 9 जणांचा मृत्य


बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून रोज मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासामध्ये बीड रुग्णालयात 10 रुग्णांचा तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.


गेल्या 24 तासांमध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरएमओ डॉ. सुखदेव राठोड यांनी दिली तर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये 9 जणांचा मृत्युू झाला असून यात सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे तर अन्य दोन जणांचा अहवाल राखीव आहे. जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. मृतांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!