Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडापक्षाच्या उमेदवारांना नापसंदी?

पक्षाच्या उमेदवारांना नापसंदी?


मजीद शेख
बीड- मराठवाडा पदवीधर निवडणुक रंगात येवू लागली. भाजपाने बोराळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इच्छूक नाराज आहेत. काहींना बोराळे पसंद नाहीत तशीच अवस्था राष्ट्रवादीत झाली. बारा वर्षापासून आ. सतिश चव्हाण मराठवाड्याचं प्रतिनिधीत्व करतात. या बारा वर्षात त्यांनी कामगिरी तरी काय केली असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राष्ट्रवादी चव्हाणांच्या प्रचाराला तितकी पुढे येत नसल्याचे दिसून येते. दोन्ही उमेदवारांबाबत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांत आणि पदवीधरात नाराजीचा सुर दिसून येतो. या निवडणुकीत तिसर्‍या उमेदवारांना पदवीधरांची पसंदी मिळू शकते.
पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुक पुर्वी तितकी चर्चेत राहत नव्हती. मात्र अलीकडच्या काळात या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण होवू लागली. पक्षीय राजकारण वाढल्याने या निवडणुकीत राजकीय मंडळीचा मोठा हस्तक्षेप वाढला. ज्यांना पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाण आहे. अशांनाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात होते. मात्र आता ह्या निवडणुकीत ज्यांना पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांची जाण नाही, त्यांना उमेदवारी दिली जावू लागली आणि ही मंडळी निवडुन येवू लागली. सध्या मराठवाडा पदवीधरांची निवडणुक चर्चेत आहे. भाजपा-राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादीकडून सतिष चव्हाण तर भाजपाकडून शिरीष बोराळकर रिंगणात आहेत. भाजपाने दुसर्‍यांदा बोराळकर यांना उमेदवारी दिली. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत उमेदवारी मिळावी भाजपाकडून अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पक्षाने बोराळकर यांचे नाव फायनल केल्याने काहींनी बंडखोरीचे हत्यार उपसले. ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलं. त्यांनाच पक्षाने डावल्याची ‘सल’भाजपात आहे. त्यामुळे बोराळकर हे पक्षाचे उमेदवार असले तरी मराठवाड्यातील सर्वच भाजपाच्या कार्यकर्त्यांना ते मान्य आहेत अशातला भाग नाही. बोराळकर यांच्या उमेदवारी बाबत भाजपाच्या पदवीधर मतदारात नाराजीचा सुर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात सगळं काही अलबेल आहे असं ही नाही. सतिश चव्हाण तिसर्‍यांदा निवडणुक लढवत आहेत, ते बारा वर्ष आमदार होते. या बारा वर्षात चव्हाण यांनी नेमकं काय केलं असा प्रश्‍न पडलेला आहे. त्यांनी कधी शिक्षकांचे प्रश्‍न सोडवले नाहीत किंवा कधी पदवीधरांच्या समस्या जाणुन घेतल्या नाही, त्यामुळे चव्हाणांच्या विरोधात मराठवाड्यातील पदवीधरात नाराजी आहे. आ. चव्हाण यांच्या बाबत कार्यकर्ते सकारात्मक नाहीत. दोन्ही पक्षाच्या उमेदवाराबाबत दोन्ही पक्षात नाराजी आहे. त्यामुळे इतर तिसरा उमेदवार ही पदवीधरांच्या पसंदीला पडू शकतो.
निवडणुक जिंकायची आणि काहीच करायचं नाही
निवडणुक कुठलीही असो, ती जिंकण्यासाठी अटापीटा करायचा, अमाप पैसा खर्च करायचा आणि निवडून आल्यानंतर काहीच करायचं नाही अशाच पध्दतीचं राजकारण झालं आहे. पदवीधर आणि शिक्षक आमदार हे नेमकं काय करतात असा नेहमीच प्रश्‍न निर्माण होत आलेला आहे. ज्याचं आपण प्रतिनिधीत्व करतोत निदान त्यांच्या समस्या तरी या आमदारांनी सोडवायला पाहिजे. मात्र तसं काहीच होतांना दिसून येत नाही. निवडणुका आल्या की, हजर व्हायचं आणि निवडणुका गेल्या की गायब व्हायचं असा प्रकार राजकारणात वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!