Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनालस नाही, 1 मे पासून लसीकरण कसं करायचं?

लस नाही, 1 मे पासून लसीकरण कसं करायचं?


मुंबई (रिपोटर):- देशभरासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू होत आहे. याबाबत आज (मंगळवार) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना माहिती देताना, लसीकरणासाठी मुंबई मनपा सज्ज असल्याचं सांगितलं. मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

महापौर पेडणेकर म्हणाल्या, आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देतो आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने मागील काही दिवस जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली व जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.आपल्याला 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस द्यायचीच आहे. मात्र लसीकरणाचा साठा आल्यानंतर जे 45 वर्षांवरील कोमॉर्बिड लोकं आहेत आणि जे 60 वर्षांवरील आहेत. ज्यांचा आता दुसरा डोस सुरू आहे. हा कार्यक्रम देखील त्याच वेळी आपल्याला चालवावा लागणार आहे. त्यामुळे अद्यापही राज्य सराकार व मनपा यांच्यात बैठका सुरू आहेत. 1 मे पासून लसीकरण निश्चितच सुरू होणार पण ते सुरू होत असताना, कुठे होणार? कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा सुरू होणार. याबाबत काही जणांच्या सूचना देखील आल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाची विभागणी करावी लागणार आहे. सर्व वयोगट एकत्र करणं हे उचित ठरणार नाही. कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतरच व लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे. आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरू आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळी गाईडलाइन येईल तेव्हा सर्वांना माहिती दिली जाईल.

Most Popular

error: Content is protected !!