Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाईत अंत्यसंस्कार करतांना कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर

अंबाजोगाईत अंत्यसंस्कार करतांना कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर


चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या युट्युब चॅनलच्या दोन पत्रकाराना संतप्त नागरिकांनी पिटाळून लावले; आज होणार तेरा अंत्यसंस्कार
अंबाजोगाई (रिपोर्टर):- अंबाजोगाई येथील सर्वे नं.१७ मध्ये असलेल्या कोरोना स्मशानभूमीत राज्य शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाने प्रचंड वेग धरला असून याचे खापर देशभरात अंबाजोगाई शहराच्या नावावर फुटू लागले आहे.
या बाबत प्राप्त सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाचे अंत्यविधी करताना राज्य शासनाने एक नियमावली तयार केलेली आहे. त्या नियमानुसार अंत्यविधी करताना म्यताच्या नातेवाईक यांना मृतदेहास हात देखील लावण्याची परवागी नाही सबंधित कर्मचारी हे पीपीकिट घालून मृतदेहास हात लावू शकतात आणि तेच अग्नी देऊ शकतात. मात्र येथे तर मृतदेह येण्यापूर्वीच स्मशानभूमीत मयताचे भरपूर नातेवाईक जमा होऊन गर्दी करू लागले तर काही नातेवाईक सरण देखील स्वत: जमवून रितिरिवाज पूर्ण करून अग्नी देखील देऊ लागले आहेत. काही जण तर शेवटचे दर्शन म्हणून मयताचे तोंड उघडून दाखवा म्हणून हट्ट करून कोणत्याही नेत्याला फोन लावून तेथे असलेल्या कर्मचारी यांच्यावर दबाव अणण्याच्या घटना देखील घडू लागल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये अंबाजोगाईच्या नावावर ८० टक्के पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही ग्रामीण भागातील येत असल्यामुळे शहरापेक्षा जास्त कोरोनाचा उद्रेक ग्रामीण भागात होत असल्याचे सध्यातरी दिसत आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कोरोना स्मशानभूमीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नसता मागील पंधरा दिवसापासून अंबाजोगाई शहराचे नाव देशभरात गाजू लागले असून यापूर्वी एकाच सरणावर आठ जणांचा अंत्यसंस्कार, ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप, एकच रुग्णवाहिकेमधून बावीस मृतदेह आणले, ऑक्सिजनसाठी अधिष्ठाता रात्रभर लातूरमध्ये या घटनेनी अंबाजोगाई शहराचे नाव देशभरात गाजू लागेल आता स्म्शानभूमीमुळे देखील गाजेल माध्यमांनी या घटना उजेडात आणल्या नाही तर हे सगळे असेच चालेल व संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड वेगाने कोरोना वाढेल.
आज देखील दुपारपर्यंत तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले आहे. काल स्मशानभूमीत युट्यूब चॅनलचे दोन प्रतिनिधी चित्रीकरण करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना हुसकून पळून लावल्याचे देखील समजते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!