Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनासकारात्मक बातमी; पाच दिवसात पाच हजार जणांनी कोरोनाला हरवले

सकारात्मक बातमी; पाच दिवसात पाच हजार जणांनी कोरोनाला हरवले

काल १ हजार २० रूग्ण ठणठणीत;रूग्णालयातून मिळाली सुट्टी
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी कोरोनावर मात करणार्‍यांचा आकडाही मोठा आहे. २१ ते २६ एप्रिल दरम्यान तब्बल ५ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जर कोरोनाचे लक्षण आढळल्यास तात्काळ तपासणी केल्यास आणि उपचार घेतल्यास रूग्ण शंभर टक्के बरा होतो. दरम्यान आजही ११०० च्या पुढे रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना दुपारनंतर घरी सोडण्यात येणार आहे.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसापासून हजाराच्या खाली कोरोनाचा आकडा येत नसला तरी दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे रोज हजार रूग्ण ठणठणीत होवू घरी परतत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांना लक्षण जाणवल्यास तात्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळेत उपचार मिळाले तर कोरोना शंभर टक्के बरा होतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. २१ ते २६ एप्रिल दरम्यान बीड जिल्ह्यात ५ हजार ३०३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. २६ एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यात एकूण ४६ हजार ३७८ रूग्ण आढळून आले असून यापैकी ४१ हजार ४४० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!