Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमवाळू टिप्परच्या धडकेत महिला ठार

वाळू टिप्परच्या धडकेत महिला ठार


आजोबा,नात जखमी; तालेवाडी फाट्याजवळील घटना

तेलगाव (रिपोर्टर):- भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या टिप्परने तिघा जणांना धडक दिल्याची घटना तेलगाव येथील तालेवाडी फाट्याजवळ घडली. या अपघातात ४३ वर्षीय महिला जागीच ठार झाली असून आजोबा व नात जखमी झाल्याची घटना घडली. भरधाव वेगातील टिप्पर महिलेला चिरडून फरार झाला होता. माजलगाव पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.
तालेवाडी फाट्याजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. तेथून शांताबाई रूस्तुम तौर, रूस्तुम तौर व त्यांची नात रा.रिधोरी ता.माजलगाव हे जात असतांना एका भरधाव आलेल्या वाळूच्या टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ४० वर्षीय शांताबाई रूस्तुम तौर या जागीच ठार झाल्या तर रूस्तुम तौर आणि त्यांची नात गंभीर जखमी झाले आहेत. रूस्तुम तौर हे सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी म्हणून आहेत. अपघात झाल्यानंतर वाळूचे टिप्पर घटनास्थळावरून फरार झाले होते. याची माहिती माजलगाव पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी त्या टिप्परचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!