Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनापंकजाताई काळजी घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच -धनंजय मुंडे

पंकजाताई काळजी घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच -धनंजय मुंडे

बीड (रिपोर्टर):- ताई या विषाणुचा सामना मी दोन वेळा केलाय, यामुळे होणार्‍या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करा म्हणत मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. प्रभु वैद्यनाथाच्या आशिर्वादाने आपण लवकर बर्‍या व्हाल, काळजी घ्या पंकजाताई असं म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं.

आज सकाळी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे माहिती देत संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याबाबत आणि काळजी घेण्याबाबत आवाहन केले. पंकजा मुंडे या कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती धनंजय मुंडे यांना झाल्यानंतर त्यांना तात्काळ ट्विट करून पंकजा मुंडेंना काळजी घेण्याबाबत सांगत मोठा भाऊ म्हणून पाठिशी असल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये ताई या विषाणुचा सामना मी दोन वेळा केलाय. यामुळे होणार्‍या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या, घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच, प्रभु वैद्यनाथाच्या आशिर्वादाने आपण लवकरच बर्‍या व्हाल, काळजी घ्या पंकजाताई असे म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!