Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाधारूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शौचासाठी जाऊ लागले बाहेर

धारूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शौचासाठी जाऊ लागले बाहेर

तालुका आरोग्य अधिकार्‍यांना याचे काही गांभीर्य आहे का नाही ?
किल्ले धारूर (रिपोर्टर)-किल्ले धारूर येथील कोविडं सेंटर मधून सकाळी पंधरा ते वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शौचालयासाठी मोकळ्या जागेमध्ये जातात व रस्त्यावर वावर करताना दिसल्यामुळे तिथून जाणार्‍या ग्रामीण भागातील नागरिक तसेच तेथील शेतकरी भयभीत झाले आहेत यासाठी एवढे ऋण बाहेर फिरतात कसे व तेथील कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी याचा बंदोबस्त करावा.


किल्ले धारूर शहरातील कोविडं सेंटर मध्ये रोज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण स्वच्छालय साठी कोविडं सेंटरच्या बाहेर उघड्यावर जाताना पाहायला मिळाले त्यामुळे तिथून जाणारा घागरवाडा गावाला जाणारा रस्ता तसेच किल्ले धारूर परिसरातील शेतीकामासाठी जाणारे नागरिक व बहुतांश ग्रामीण भागातून शहराला दूध पुरवठा होतो त्यामुळे तिथून दूधवाले शेतामध्ये काम करणारे यांना जाण्यासाठी त्या रस्त्याने गोविंद रुग्ण बिनधास्त वावरताना दिसत असल्यामुळे तिथून दूधवाले शेती काम करणारे यांना भीती वाटू लागली रुग्णांचे अजबच झाले त्यांना कुणी जाब विचारणारे आहे का नाही तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती टकले यांना विचारले असता ते म्हणतात पाण्याची सोय आहे बाहेर रुग्ण नाही जात पाण्याची सोय आहे मग रुग्ण गेले कसे?सेंटरला कोणाचा वाच आहे का नाही यावरून सिद्ध होत आहे कारण सकाळी पंधरा ते वीस रुपये ग्रामीण भागाकडे जाणार्‍या रस्त्यावर वावरताना पाहायला मिळाले हे रुग्ण असेच रस्त्याने वावरत असतील तर तेथून जाणार्‍या नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ होऊ शकते पण तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वाती डीकले उडवाउडवीची उत्तरे देऊन असं काही झालंच नाही असं सांगत आहेत. तरी हा गैरप्रकार लवकरात लवकर थांबावा व वरिष्ठांनी याची दखल घ्यावी व जे कोणी याला जबाबदार असेल याच्यावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे .

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!