बीड (रिपोर्टर) केज तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतने 14 वा व 15 व्या वित्त आयोगात भ्रष्टाचार केला असून या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी काही ग्रामस्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. (पान 7 वर)
2020 ते 2022 या दरम्यान 14 वा व 15 वा वित्त आयोगाचा निधी आलेला होता. या निधीचा उपयोग योग्य पद्धतीने करण्यात आला नाही. निधीमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर नागरिकांचे आमरण उपोषण सुरू आहे.