Friday, October 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयरोख-ठोक : मसनवाट्यातील रांग

रोख-ठोक : मसनवाट्यातील रांग

अच्छे दिनची गुहार देत अखंड हिंदुस्तान काबीज करायला निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सहा वर्षाच्या कालखंडात देशवासियांना काय दिले? खरच देशात अच्छे दिन आले का? २०१४ निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीने देशवासियांना जे आश्‍वासन दिले, देशवासियांना जे स्वप्न दाखवले ते पुर्णत्वास नेले का? १५ लाखाच्या जुलमेबाजी स्टेटमेंटपासून घराघरातल्या चुलीतल्या धुरापर्यंत माताभगिनींचे आश्रु पुसले गेले का? की ते धुराचे आश्रु आज दु:खांकीत आश्रु होतात का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. नोटबंदीच्या निर्णयाने उभ्या देशाला बँकेसमोर रांगेत उभे रहावे लागले. अनेकांना रांगेतच मरावे लागले. नोटबंदीपासून केंद्र सरकारच्या निर्णयाने उभ्या देशाला अक्षरश: जिथे तिथे रांगेतच उभे केले. नोटबंदी ते थेट आज स्मशानातही मृतदेह जाळण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते हे जागतिक महासत्ताक होवू पाहणार्‍या देशाचे किती मोठे दुर्दैव. कोरोनाच्या महामारीने हाहाकार उडवून दिल्यानंतर लोक मृत्यूची दारात जाणार हे माहित असल्यानंतरही केंद्र सरकार म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ज्या पद्धतीने कोरोनाला हद्दपार करण्याइरादे बालीश उपाय योजना केल्या आणि केवळ सत्ता केंद्र ताब्यात राहावेत म्हणून कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याचा धोका असतांना ज्या पद्धतीने सहा राज्यात निवडणूका घेतल्या यातूनच राज्यकर्त्यांचे सत्तालोपी धोरण दिसून आले. राज्यकर्त्यांच्या या सत्तालोपी धोरणातून देशाचं आणि देशवासियांचं किती वाटोळं झालं हे शब्दात मांडणं कठीण होवून बसलं. आम्ही करतो तेच खरे आणि बोलू तेच त्रिवार सत्य या अहंकारी वृत्तीने देशाचा जो मसनवाटा झाला आणि अजग्र असा अखंड हिंदुस्तानवर आर्थिक, सामाजिक, मानसिकदृष्ट्या धारातिर्थ पडण्याची

rok thok

वेळ आली याला जबाबदार कोण?
अंबरीत बसण्याचा शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदींना असू शकतो. परंतू मसनवाट्यात जळणार्‍या चिता देशातल्या घराघरात किती मोठा शोक प्रकट करायला लावत असतील हे न सांगितलेले बरे. देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जो हाहाकार उडवून दिला आणि मसनवाट्याला अक्षरश: सुगीचे दिवस आणून ठेवले हे देशासाठी भुषणावह नव्हे प्रख्यात जागतिक व्यंगचित्रकार डेव्हीड रोवे यांनी पंतप्रधान मोदींवर नुकतेच एक जहाल व्यंगचित्र रेखाटून भारतातील परिस्थितीचे गांभीर्य जगासमोर मांडले. या व्यंगचित्रात एक अगडबंब हत्ती जमिनीवर मरून पडलेला आहे. व त्या मेलेल्या हत्तीवरील अंबरीत मा.श्री.नरेंद्र मोदी हे माहुताच्या भूमिकेत बसले आहे. मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहुत अशा शिर्षकाचे हे टोकदार व्यंगचित्र ऑस्ट्रोलियन वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. हे व्यंग चित्र देश म्हणून आम्हा भारतीयांची नक्कीच मानहानी करणारी आहे. परंतू आजची ही भयावह परिस्थितीही नाकारता येणारी नाही. लोक इकडे कोरोनाने तडफडून मरत आहेत. कोणाला ऑक्सिजन नाही, कोणाला रेमडेसीवर नाही तर कोणाला बेड मिळत नाही. सर्वत्र हाहाकार भितीदाय परिस्थिती असतांना केंद्र सरकार मात्र वेगवेगळे राज्य काबीज करण्याइरादे निवडणूकीत मग्न राहतात. ज्या अजाग्र अशा हत्तीसारख्या देशाच्या सर्वोच्च अंबरीत बसून पंतप्रधान आपली विजयी पताका फडकवतात तोच अजाग्र हत्तीसारखा देश आज कोरोनाने धारातिर्थ पडतांना दिसून येत आहे. देशभरातल्या मसनवाट्यातली परिस्थिती पाहिली आणि धगधगत्या पेटलेल्या चिता पाहिल्या तर परिस्थिती दिवे पाझळण्यासारखी, टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासारखी नक्कीच नाही. रोम जळत असतांना न्युरो तेंव्हा फिडेल वाजवायचा आणि आज भारतात चिता जळत असतांना केंद्र सरकार


निवडणुकांचे ढोल
पिटवत होतं. कोरोनाची पहिली लाट देशात येवून गेली. तिचे गांभीर्य देशवासियांनाही होते. त्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातला प्रत्येक नागरिक निधड्या छातीने समोर आला. शासन प्रशासन व्यवस्थेने ज्या काही सूचना केल्या त्या प्रत्येक सूचनाचे पालन देशातल्या प्रत्येक नागरिकांनी केलं. अक्षरश: घरात मड झाकून शोक प्रकट न करता कोरोना हद्दपार करण्याइरादे इमाने इतबारे काम केले. काही दिवस कोरोनाने विश्रांती घेतली असे वाटत असतांनाच महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत राहिला. ठाकरे सरकारने राज्यात कोरोना वाढतोय म्हणून सातत्याने उपाय योजना सुरू ठेवलं त्यावेळी देशभरातील भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रातच कोरोना का वाढतोय? यावर भाष्य करत जणु ठाकरे सरकारनेच महाराष्ट्रात कोरोनाला संभाळून ठेवलय. या आवेशात राजकारण करत राहिले आणि तिकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह सहा राज्यात निवडणूकांचे ढोल पिटवत राहिले. कोरोना हा समुह संसर्ग असणारा रोग आहे, जिथे जिथे गर्दी वाढेल तिथे तिथे कोरोना वाढतो हे उभ्या जगाने अनुभवले आहे. कोरोना अद्याप गेलेला नाही हे माहित असतांना केंद्रातले भाजप सरकार आणि त्यांचे मंत्री ज्या पद्धतीने निवडणूकांना सामोरे गेले, लाखोंच्या उपस्थितीमध्ये जाहिर सभा घेवून त्या-त्या राज्यातल्या जनतेला अक्षरश: कोरोनाच्याच दारात नव्हे तर मसनवाट्याच्या दारात नेवून उभा केले. याला दोषी कोण? आज देशात साडे तीन लाख ते चार लाख कोरोना बाधीत रूग्ण मिळून येवू लागले आहेत. ज्या राज्यात निवडणूका झाल्या त्या राज्यामध्ये कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सत्तेचा ढोल पिटवण्यासाठी आणि आपल्याच पक्षाची पताका फडकवण्यासाठी सवर्वसामान्य माणसांच्या


पोते नेतात तसे मृतदेहाची वाहतुक
आणि स्मशानसमोरच्या तिरड्या

पाहिल्यानंतर संवेदनशिल माणसाच्या कुंच्याही मानाला राग आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या महामारीत मृत्यूमुखी पडणार्‍यांचा आकडा रोज जिल्हा पातळीवर २५ ते ३० वर जातोय. राज्य पातळीवर हजार पाचशात जातोय तर देशपातळीवर हा आकडा दहा-पाच हजारात जातोय. हे जेंव्हा मृतदेह याची देही पाहतो तेंव्हा हेची डोळे आंधळे व्हावेत असे वाटते. अंबाजोगाईत एकाच वाहनामध्ये जे २२ मृतदेह पोते टाकले तसे रचले गेल्याचे चित्र जेंव्हा देशाने पाहिले तेंव्हा अवघा देश हळहळून गेला. दिल्ली असेल, मुंबई असेल हैद्राबाद असेल, गुजरात, उत्तरप्रदेश, पश्‍चिमबंगाल या अन्य कुठलही राज्य असो त्या राज्यात स्मशानासमोर मृतदेहाच्या तिरड्या ज्या रांगेत ठेवल्यात ते पाहिल्या नंतर देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान म्हणण्याची वेळ आज प्रत्येकावर आली. ही वेळ कोणी आणली? हा सवाल उपस्थित झाल्यानंतर एक तर चीनकडं बोट केलं जात नाही तर सर्वसामान्य माणसाच्या बेशिस्त पणाकड. परंतू केंद्र सरकार या परिस्थितीला अधिक प्रमाणात जबाबदार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कोरोना हा समुह संसर्ग वाढवतो हे माहित असतांना घेतल्या गेलेल्या निवडणूका आणि केवळ एखाद्या राज्यात आपली सत्ता नाही म्हणून त्या राज्याला सातत्याने दुजाभावाची दिली जाणारी वागणुक पाहिली तर महाराष्ट्रात आणि देशात कोरोना हा सत्तेच्या मदमस्थ वर्तनामुळेच झाला असे सर्वसामान्य तर सोडा थेट आता न्यायालयही म्हणू लागले आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार आणि भाजप नेत्याच वर्तन हे राजकारणातलं सर्वात


मड्यांची शिडी
कोण करतय? हे आता उभ्या देशानेच नव्हे तर जगाने पाहिलं आहे. केंद्र सरकारचा हा बेजबाबदार आणि बेशिस्तपणा पाहता सर्वोच्च न्यायालयाने कोरोना वाढीला देशाच्या निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. खरच परिस्थितीचं गांभीर्य मोदी सरकारच्या लक्षात आले असते आणि त्यांनी निवडणूक आयोगाला निवडणूका न घेण्याबाबत सूचविलं असतं तर सहा राज्यात खरच निवडणूका झाल्या असत्या का? सत्ताधारी पक्ष म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवडणूक आयोगाने ऐकलं नसतं का? परंतू उभा देश कॉंग्रेसमुक्त करण्याची इर्शा आणि देशभरात आपलच कमांड असावं ही अहंकारी वृत्ती ज्याच्या अंगी आहे तो स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी लोकांच्या मृतदेहांची शिडी करायलाही मागे पुढं पाहणार नाही हा लोभी सत्ताधिशांचा इतिहास आहे. त्याच इतिहासाची पुनर्रावृत्ती भारतात झाली आहे. देशभरातील मसनवाटे पाहिल्यानंतर अंगावर शहारे आणि दु:ख व्यक्त होण्यापेक्षा आज जो संताप व्यक्त होतोय त्या संतापाचे शब्दात वर्णन करणं शक्य नाही. तळपायाची आग मस्तकाला जावी, हाताच्या मुठी वळाव्यात, डोळे लालबुंग व्हावेत, मस्तकावर आट्या पडाव्यात, दात करकचून खावेत आणि असा बेजबाबदारपणा करणार्‍या आणि केंव्हाही राजकारण करू पाहणार्‍या सत्ताधिशांच्या गळ्यापर्यंत हात न्यावा हा संताप आज प्रत्येक देशवासियांना येतोय तो केवळ


गलिच्छ राजकारण
म्हणावं लागेल. ऑक्सिजनचा तुटवडा असो, कोरोना लसीकरण असो अथवा रेमडेसीवर इंजेक्शन असो यावर जे राजकारण झाले आणि केले गेले ते संतापजनक. महाराष्ट्रातला कोरोनाबाधित रूग्ण रेमडेसीवरसाठी तडफडत होता. त्याचे नातेवाईक धावाधाव करत होते मात्र सरकारकड इंजेक्शन उपलब्ध नव्हते तेच इंजेक्शन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस असो अथवा नरगचा खासदार सुजय विखे असो यांच्याकडे १० हजार इंजेक्शन येतात कोठून? हा सवाल आम्हीच नाही तर न्यायालयाने विचारला आहे. हे कुठलं नीच प्रकारचं राजकारण? केवळ महाराष्ट्रातल्या कोरेाना बाधित रूग्णांना ठाकरे सरकारकडून मोफत इंजेक्शन मिळू नये यासाठी जर एवढा खटाटोप असेल तर राज्यातल्या आणि देशातल्या भाजपाला लोकांना आणखी कुठकुठल्या रांगेत उभे करायचे आहे. जन्म ते मृत्यू भारतीयांच्या नशिबी नुसती रांगच येत असेल तर याला अच्छे दिन म्हणायचे का? हा सवाल आता उपस्थित होणारच.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!