Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाराजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले, मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाची...

राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले, मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाची याचिका


चेन्नई (वृत्तसेवा):- धाव घेतली आहे. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती. आयोगाच्या अधिकार्‍यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं सांगत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेत प्रसारमाध्यांनी सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत आणि केवळ निकालात नोंदवलेल्या निरीक्षणाचा अहवाल द्यावा अशी मागणी केली आहे. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे, असंही निवडणूक आयोगाने याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने यावेळी राजकीय नेते आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचाही उल्लेख केला आहे. शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. येत्या २ मे रोजी होणार्‍या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!