Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडउक्कडपिंप्रीत दोन गट आमने-सामने; ४ जखमी

उक्कडपिंप्रीत दोन गट आमने-सामने; ४ जखमी


बीड (रिपोर्टर):- आमच्या विरोधकाला का बोलतात, असे म्हणत सरपंचाच्या गटाने उक्कडपिंप्री येथील चौघा जणांना मारहाण केल्याची घटना रात्री घडली असून जखमींवर शहरातील काकु-नाना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.


गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील दत्तात्रय बाबुराव बांगर, सविता दत्तात्रय बांगर, गोकुळ अर्जुन बडे, राणी गोकुळ बडे यांच्यावर शहरातील काकु नाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. काल रात्री उक्कड पिंप्री येथील सरपंचाच्या गटातील काही लोकांनी गोकुळ अर्जुन बडे यांच्या घरी येऊन त्यांना मारहाण केली. या मारहाणीत गोकुळ बडे व त्यांची गंभीर जखमी झाले तर दत्तात्रय बांगर, सविता बांगर यांना देखील मारहाण करण्यात आली. जखमींवर उपचार सुरू असून दुपारी उशिरापर्यंत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. विष्णू साहेबराव बांगर यांना तुम्ही का बोलतात, ते आमचे विरोधक आहेत, असे म्हणत सरपंचाच्या गटाने त्यांना मारहशर केल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!